वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यात जल पर्यटन विकसित करण्याच्या दृष्टीने इंडियन इन्सिटटयूट ऑफ स्कूबा डायव्हिंग अँन्ड ॲक्वाटिक स्पोर्टस तारकर्ली ता. मालवण जि.सिंधुदुर्ग येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची जल पर्यटन प्रशिक्षण संस्था सन 2015 मध्ये कायान्वीयत केली आहे. या जलपर्यटन व आपत्ती व्यवस्थापनामध्ये बोट चालविणे, जीवरक्षक, बचाव, स्कूबा डायव्हिंगचे महत्व ओळखून महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन समितीने जिल्हयातील प्रत्येकी 5 युवकांना बोट चालविणे व जीवरक्षक आणि प्रत्येकी 5 युवकांना बचाव स्कूबा डायव्हिंगच्या प्रशिक्षणाकरीता पहिल्या टप्यामध्ये 5 प्रशिक्षणार्थींना इसदा, तारकर्ली जि. सिंधुदुर्ग येथे 14 जुन ते 21 जुन 2023 या कालावधीमध्ये हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
जिल्हयातील अनुभव असलेल्या तसेच पुढील अटी व शर्तीची पुर्तता पूर्ण करणाऱ्या युवक/युवतींनी सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात अर्ज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे 7 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावे. पहिले प्रशिक्षण बोट चालविणे आणि जीवरक्षक प्रशिक्षण 14 ते 21 जुनपर्यंत, दुसरे प्रशिक्षण बचाव स्कूबा डायव्हिंग प्रशिक्षण 6 ते 20 ऑक्टोबर या दरम्यान आहे.
या प्रशिक्षणासाठी निवड निकष पुढीलप्रमाणे आहे. युवक/युवती 18 ते 25 वयोगटातील असावेत. त्यांचे वजन किमान 55 किलो असावे. प्रमाणित डॉक्टरचे स्वास्थ प्रमाणपत्र असावे. गेल्या 6 महिण्यात कोणतीही शस्त्रक्रिया झालेली नसावी. कमीत कमी 1 कि.मी. पोहता यावे. पाण्यात हाताचा वापर न करता किमान 10 मिनिटासाठी तरंगता आले पाहीजे. या प्रशिक्षणस्थळी जाण्या येण्याचा प्रशिक्षणार्थ्याला स्वत: करावा लागेल . असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण यांनी कळविले असल्याचे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे .