आज दिनांक 24/10/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पो.स्टे. वरोरा हददीत पेट्रोलींग करीत असतांना मिळालेल्या माहितीनुसार होंडा एक्टीवा मोपेड गाडी मधे अवैध्यरित्या दारु वाहतुक करणार आहे, अशी खात्रीशीर माहीतीवरुन आनंदवन कडून मजरा कडे जाणाऱ्या रोड वर नाकाबंदी केली असता होंडा एक्टीवा गाडीची पाहणी केली असता पायदानावर ठेवलेल्या बॅगमध्ये देशी दारूच्या प्रत्येकी 90 ml 400 नीपां किंमत 14000/- रू. व होंडा एकटीचा मोपेड गाडी किंमत 60,000/- रू. माल असा एकूण 74,000/-रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष कारवाई करून जप्त करण्यात आला.व आरोपी निलेश रमेश मेश्राम, वय 30, मालवीय वार्ड यास पुढील कारवाहीस पो.स्टे.वरोरा यांचे ताब्यात देण्यात आले.
आरोपी विरुध्द पो.स्टे. वरोरा येथे अपराध कलम 65 (अ) म.दा.का.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाही
स.फौ. धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर पो हवा. नितीन कुरेकार, पोअं प्रशांत नागोसे, शशांक बदामवार ,चापोहवा दिनेश अराडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर यांनी केली.