अकोला:- येथील मोठ्या उमरी मधील श्री गजानन महाराज मंदिरात आयोजित बालसंस्कार शिबिरामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.धर्मनाथजी इंगळे अध्यक्ष श्री बाराभाई गणेशोत्सव मंडळ हे उपस्थित होते. यावेळी या बालसंस्कार शिबिराचे आयोजक तथा अध्यक्ष श्री गजानन महाराज मंदिर ह.भ.प.श्री.भाऊसाहेब कपले महाराज, शिबिराचे मुख्य प्रशिक्षक श्री.कोल्हे महाराज, श्री कैलासनाथजी इंगळे उपाध्यक्ष श्री बाराभाई गणेशोत्सव मंडळ श्री.भोलनाथजी नळेकर, उपाध्यक्ष गजानन महाराज मंदिर श्री राहुल इंगळे विश्वस्त श्री बाराभाई गणेशोत्सव मंडळ,श्री यश इंगळे आदींसह मान्यवर उपस्थित होते. शिबिरात सहभागी मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, ज्यामुळे शिबिराला एक वेगळा रंग प्राप्त झाला होता. मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.