कारंजा : श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या तसेच जिल्हाध्यक्ष सौ. किरण ताई गिरे यांच्या आदेशाने दिनांक 20/ 02/ 2024 रोजी तहसीलदार कारंजा यांना निवेदन देण्यात आले. ईव्हीएम मशीन मध्ये काही तांत्रिक बिघाड करून मतांची चोरी केल्या जाते,त्यामुळे सदर मशीन बंद करून बॅलेट पेपरवरच येणाऱ्या सर्वच निवडणुका घेण्यात याव्या.तसेच "काही वर्षांपूर्वी दि. ८ ऑक्टोंबर 2013 रोजी सदर मशीन मध्ये काही तांत्रिक बिघाड करून मतांची हेराफेरी करण्यात आली होती." असा निकाल न्यायालयाने नुकताच जाहीर केला होता. त्या अनुषंगाने येणाऱ्या सर्वच निवडणुका या ईव्हीम मशीन बंद करून बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्यात.अशी वंचित बहुजन आघाडी तालुक्याच्या वतीने मागणी करण्यात येत आहे . सदर मागणी पूर्ण न झाल्यास वंचित बहुजन आघाडी चे मा. राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने तिव्र स्वरूपात स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. याची नोंद घ्यावी. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी जिल्हा उपाध्यक्ष
किशोरभाऊ ऊके, तालुका महासचिव रविंद्र भुसारे, तालुका मार्गदर्शक देवराव कटके, युवा तालुका अध्यक्ष रुपेश शहाकार श्रीकांत बागडे उपाध्यक्ष युवा विलास डोंगरे शहर उपाध्यक्ष,शेषराव चव्हाण शहर संघटक, चंद्रमणी लांजेवार, सदानंद कटके,
मा. विनय सोनवणे, भारत भगत (पाटील), नंदू भाऊ आडोळे, सर्कल अध्यक्ष विलास वानखडे ( बामर्डा)
मा. राहुल इंगळे ग्रा. सदस्य ( बामर्डा)
नितेश वानखडे, गौतम बनसोड,
बबन वानखडे तालुका उपाध्यक्ष गणेश मस्के तालुका उपाध्यक्ष महादेव खडसे, मनवर साहेब, मनोज ठोंबरे, सुमित भगत, संजय खाडे, माजी उपसरपंच मोसंबी बाई, विनोद नंदागवळी, मीना वानखडे, अनुराधा शेंडे, सुमन खंडारे, नर्मदाबाई गवई, प्रभाबाई जाधव, पुष्पाबाई भिसे, रेखा गजभिये, शिलाबाई राऊत, वंदना धनवे, शुभम शिरसाट व असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते व महिला पदाधिकारी उपस्थित होते . असे वृत्त मिळाल्याचे आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले .
आपल्या प्रतिक्रिया द्या....