कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती, अमरावती जिल्हा मिनी गोल्फ असोसिएशन यांचे
संयुक्त विद्यमाने 3 फेब्रु, रोजी डॉ. बाबासाहेब आम्बेडकर महाविद्यालय, अमरावती येथे संम्पन्न झालेल्या विभागस्तरिय मिनीगोल्फ स्पर्धेमध्ये बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डी येथील 14 व 17 वर्षे वयोगटातील 21 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 17 विद्यार्थ्यांना मेडल प्राप्त झालेत.
या स्पर्धेत 17 पैकी 8 मुलींनी प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल)
प्राप्त करून राज्य स्तरासाठी स्तरासाठी झेप घेतली आहे.
विभागीय क्रीडा संकुल, मानकापुर, नागपुर येथील 6 ते 10 फेब्रु. दरम्यान आयोजित राज्यस्तरीय खेळण्या साठी पात्र ठरलेले विद्यार्थी खालील
प्रमाणे आहेत.
17 वर्षे आतील मुलीच्या टीम इवेंट मध्ये प्राची हिम्मत आडोळे, वेदिका निरंजन करडे, जानवी वसंता पारे, मुक्ता संतोष कापसे, आचल दिगांबर दिहाडे, प्रशिका विनोद मानवतकर,सृष्टी वासुदेव करडे ,आरती तुफान बोनके आदिनी प्रथम क्रमांक मिळवला व राज्यस्तरा करीता पात्र ठरल्यात.
त्याचप्रमाणे 14 वर्षे मुलांच्या वयोगटात टीम ईव्हेट मध्ये विभाग स्तरावर शाळेच्या आयुष मांगे,भावेश येवले,दक्ष दिहाड़े,सोहम कदम,वंश आडोळे, निखिल कोपरकर, पवन वडेकर, विनय ठाकरे यानी द्वितीय क्रमांक मिळवला. तर 14 वर्ष आतिल सिंगल इव्हेट मध्ये भाविका लोडम हिने तृतीय क्रमांक
प्राप्त केला.
8 विद्यार्थीनींचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता प्राप्त केल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांनी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून
अभिनंदन केले. सर्व खेळाडूंनी अतिशय उत्कृष्ट खेळ करून अमरावती विभागातून यशस्वी होण्याचा बहुमान मिळवला, त्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने तसेच शाळेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचं श्रेय शाळेतील क्रीडा शिक्षक राजेश शेंडेकर व मुख्याध्यापक विजय भड यांना दिले आहे.
यशस्वी खेळाडूंचे संस्था अध्यक्ष योगेश खोपे,सचिव वामनराव घोडे व सर्व संचालकांनी कौतुक केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक विजय भड, क्रीडा शिक्षक राजेश शेंडेकर तसेच शिक्षक गोपाल काकड,अनिल हजारे व शिक्षकेतर कर्मचारी देविदास काळबांडे, भालचंद्र कवाने, राजू लबडे,राजेश लिंगाटे आणि राजेंद्र ऊमाळे यांनी अभिनंदन केले. असे वृत्त आमचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....