वाशीम : संपूर्ण भारतभर भ्रमंती करून आलेल्या सोलापूर येथील सोवेरियन रायडर्स सोलापूर यांचेचे,मेळघाट राईड (जंगल सफारी) करीता,सोलापूर ते मेळघाट जात असतांना,कारंजा येथील उद्योजक रवीन्द्र शहाकार यांच्या हॉटेल नारायणच्या परिसरात, विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा कडून शाही स्वागत करण्यात आले.याप्रसंगी पायलट कारचे अजित वायचाळ व ग्रुपचे स्वागत कारंजा येथील विलोसचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे,नाट्य कलावंत नंदकिशोर कव्हळकर,मोहीत जैन ( जोहरापूरकर ) डॉ.ज्ञानेश्वर गरड,प्रदिप वानखडे,गजानन चव्हाण,देवमनराव मोरे,ओम भेलांडे,यश शाहू, ऋतुराज रोडे,नंदकिशोर कनोजे आदींनी केले.आलेल्या रायडर्स च्या भ्रमंतीचा उद्देश ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी जाणून घेतला असता हे सर्व रायडर्स मोठमोठे पदविधर असून अधिकारी पदावर किंवा उद्योजक असून, आपला कामाचा ताणतणाव कमी करण्यासाठी,भ्रमंती मधून गडकिल्ल्याची पाहणी व स्वच्छता, वाहतुकीच्या नियमाचे मार्गदर्शन व राष्ट्र संरक्षणाच्या दृष्टिने जनजागृती करीत असतात.असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांनी संजय कडोळे यांचे कडून कारंजा नगरीचा इतिहास जाणून घेतला.यावेळी सोवेरियन रायडर्स सोलापूरच्या ग्रुपमध्ये रायडींग सीकवेन्स
लीड मध्ये महेश पाटिल,अजिंक्य जोशी,चेतन लोंढे,किरण नागमंगलं,प्रसाद कुलकर्णी,अभयसिंग देशमुख,उदय सुमंत,शरद भोसले,फय्याज शेख,आलोक इंडि,डॉ. आनंद जगताप,वैभव होमकर,आनंद पाटिल,नारायण कोडक,संदीप केमकर,डॉ. सारंग बोबडे,आशुतोष पाटिल,शैलेश पाटिल,तात्या तरेंगे (skipper),पवन मोंढे ;कार रायडर्स : पहिली स्किपर कार : प्रवीण कांबळे,सुजितकुमार जगताप,राहुल मोकाशी,यशवंत सादुल ; पायलट कार : सचिन जोशी,अमोल सारडा,अजित वायचळ,सचिन वडगावकर ; टेल कार : संतोष क्षीरसागर,जयेश आणगोंडा,आनंद गाडे ; 2nd टेल कार / बाईक : दर्शन भिवंडकर,बाळकृष्ण मालप,संतोष खानविलकर
; 3rd Tail Car : शेखर कासेगावकर,डॉ. प्रसन्न खटावकर,प्रसाद कुलकर्णी इत्यादी रायडर्स मित्र होते. सर्व रायडर्स यांनी करंज ऋषींनी स्थापन केलेल्या आणि शिवछत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या कारंजा नगरीला व कारंजेकरांना मानाचा मुजरा करीत श्री कामाक्षा माता चरणी आणि श्री नृसिंह सरस्वती स्वामी जन्म स्थळाच्या दर्शनाची इच्छा व्यक्त करीत दर्शन घेतले श्री नृसिह सरस्वती स्वामी मंदिर विश्वस्तांच्या वतीने प्रा. प्रकाश भाऊ घुडे, मोहन तांबोळकर यांनी श्रीफळ व महाप्रसाद देवून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर रायडर्स मेळघाट कडे रवाना झाले.कारंजेकर विदर्भ लोककलावंत संघटनेने घेतलेल्या रायडर्सच्या स्वागताबद्दल डॉ. सुभाष रत्नपारखी यांनी संजय कडोळे,नंदकिशोर कव्हळकर,मोहीत जोहरापूरकर यांचे आभार मानले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....