विदर्भातील सरळ खरेदी धारक शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश प्राप्त झाले असून १६,६३३ हेक्टर सरळ खरेदीने संपादित झालेल्या जमीनीला गेल्या २६ सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे संपन्न झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ८३२ कोटी रुपये सानुग्रह अनुदानास मंजूरी दिली आहे.सदरची कार्यवाही विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांना करण्याचे निर्देश दिले असून.शेतकऱ्यांच्या संघर्षातून मंजूर झालेला हक्काचा मोबदला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी पुर्वी देण्याची मागणी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या शिष्टमंडळाने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक मा.सोनटक्के साहेब यांना केली आहे.आजच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मोबदला वितरण प्रणाली तसेच संबंधित इतरही बाबींवर चर्चा केली असुन.सोनटक्के यांनी सुध्दा सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची दिवाळी आनंदाची होईल अशी आशा संघटनेला असल्याचे मनोज भाऊ चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मुरादे, सहसचिव भुषण चौधरी, गौतमराव खंडारे,मनोज भाऊ तंबाखे, दिलीपभाऊ कदम राजुभाऊ लोणकर,मनोज जैन,प्रा. निलेश ठाकरे, चंदु भाऊ खांडेकर, उपस्थित होते.