कारंजा : कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे दिर्घकाळपर्यंत प्रतिनिधित्व करणारे,एकमेवाद्वितीय भाजपा आमदार स्व.राजेंद्र पाटणी यांचे दिर्घ आजाराने मुंबई येथील रुग्नालयात शुक्रवार दि 23 फेब्रुवारी रोजी आकस्मिक निधन झाले होते.रात्री उशीरा त्यांचे पार्थीव मतदार संघात कारंजा येथे अंत्यदर्शनासाठी आणले असता, सर्वपक्षिय स्थानिक नेते,महिला पुरुष कार्यकर्ते,पत्रकार मंडळीसह हजारो मतदारांनी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली. त्यानंतर त्यांना त्यांचे मायभूमी वाशिम येथे आणण्यात आले.दूसरे दिवशी शनिवारी त्यांच्या पार्थीवाचे वाशिमकरांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर जवाहर नगर,पाटणी चौक प्रमुख मार्गाने मोक्षधाम वाशिम येथे अंत्ययात्रा नेण्यात आली.यावेळी त्यांचे चिरंजीव ज्ञायक पाटणी यांनी त्यांना मुखाग्नी दिला. अंत्यसंस्काराचे वेळी पोलीस प्रशासनाकडून तिनवेळा बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली . अत्यसंस्काराला पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावनाताई गवळी, आमदार लखन मलिक, आमदार अमित झनक,आमदार ॲड किरण सरनाईक, रणधीर सावरकर, आकाश फुंडकर, तानाजी मुटकुळे,माजी आमदार विजय जाधव, माजी मंत्री संजय कुटे, गुलाबराव गावंडे, संजय देशमुख, माजी खासदार अनंतराव देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांतदादा ठाकरे, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी (एस), जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसिलदार कारंजा, पोलीस उपनिरीक्षक कारंजा,कारंजा येथील भाजपा तालुकाध्यक्ष राजीव काळे, शहर अध्यक्ष ललित चांडक, संजय भेंडे, राजू भेंडे, जिग्नेश लोढाया, माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा व बहुतांश सर्वपक्षिय कारंजेकर वाशिमकर नागरिकांची बहुसंख्येने उपस्थिती होती .