अकोला-- छत्रपती शिवाजी महाराज सुशासन व्यवस्थेचे जनक होते. त्यांनी लोकाभिमुख हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली असे प्रतिपादन सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी केले.
अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा शाखेच्या वतीने आयोजित स्वराज्याभिषेक दिन कार्यक्रमात बोलत होते .अखिल भारतीय मराठा महासंघाचे विदर्भ प्रमुख राम मुळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्वप्रथम छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्वचारोग तज्ञ डॉक्टर प्रफुल्ल वाघाडे, अखिल भारतीय मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सतीश सुर्वे , स्वस्तिक टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट चे संचालक रवींद्र देशमुख, ad. रवींद्र महाले यांनी आपल्या भाषणातून स्वराज्यअभिषेक दिनाविषयी समयोचित भाषणे झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातील शेतकरी,सामान्य माणूस यांच्यासाठी सुशासन दिले. प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासन व्यवस्थेचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राम मुळे यांनी अध्यक्षीयभाषणातून केले.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश ठाकरे, डॉक्टर तेजराव नराजे, दिलीप बापू देशमुख, काशिनाथ निकोसे, अमित देशमुख ,कपिलेश गायकवाड, केएम बापू देशमुख, डॉ. सौ सुचित्रा मोहिते, मोहित संदीप वजगडे यांचे सह शिवप्रेमी व मराठा महासंघाचे कार्यकर्ते महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन विठ्ठल गाढे पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन श्रीकृष्ण माळी यांनी केले.' जय जिजाऊ जय शिवराय' या गर्जनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....