वाशिम : महाराष्ट्र शासनाच्या विशेष सहाय्य योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्याना अनुदान वितरीत करण्यात येते.त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इत्यादी योजनांचा समावेश होतो.सदर योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे
आवश्यक आहे.त्यासाठी याव्दारे सर्व संबंधित नागरीकांना आवाहन करण्यात येते की, दि. ८ ते २० जुलै २०२४ या कालावधीमध्ये निवृत्ती वेतन योजनांचा लाभ घेण्याकरिता पात्र नागरिकांनी ऑनलाईन अर्ज करावेत.सदर कालावधीमध्ये ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची छाननी करुन पात्र
लाभार्थ्याना अनुदान मंजूर करण्यात येईल. दि.२० जुलै नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.याची संबंधीत सेतू संचालकांनी व नागरिकांनी नोंद घ्यावी.