वाशिम : अनेकदा आम्ही रस्त्याने जात असतांना पाहतो की, तरुण वयातील दळ्भद्री मुले कर्कश हार्न वाजवीत, सुसाट वेगाने गावातून व प्रचंड गर्दीतून आपल्या समोरून निघून जात असतात. त्यांच्या वैयक्तिक सुसाट वेगाने गाडी चालविण्याचा प्रचंड त्रास रस्त्याने जाणार्या - येणार्या इतर पादचारी किंवा नागरिकांना होत असतो परंतु या दळभद्री तरुणांना त्याची काहीच पर्वा नसते. मात्र एक दिवस एकतर स्वतः ही मुले अपघातात जीवानिशी जातात. किंवा इतरांना अपघाताने ठार मारीत असतात. प्रचंड लोकसंख्येच्या मानाने आपल्या राज्यात वाहतूक पोलीसांची संख्या नगण्य असल्यामुळे पोलीस विभाग अशा उनाडक्या तरुणाईवर लक्ष्य ठेवण्यास कमी पडते त्यामुळे प्रत्येक पालकांनीच जर सुसाट वेगाने वाहने चालविणार्या आपल्या तरुण मुलांवर दबाव ठेवला तर मात्र अपघाताचे प्रमाण बर्याच अंशी कमी होऊ शकते असे आपले स्पष्ट मत असल्याचे समाजसेवक संजय कडोळे यांनी म्हटले आहे. प्रचंड वाढत्या लोकसंख्येमुळे दिवसेंदिवस लहान व चिंचोळे पडत जाणार्या, प्रत्येक शहरातील जुन्या वस्तीमधील रस्त्याने वाहने चालवितांना सुसाट वेगाने वाहने चालविणे हे आचारसंहितेला धरून नसल्याचे आणि स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात टाकणारे असल्याचे सुद्धा त्यांनी सांगीतले आहे.