आज ब्रह्मलीन संत अक्षयानंद सरस्वती स्वामी महाराज आपल्यात शरीरुपाने नाहीत परंतु सूक्ष्म रूपाने ते आहेत त्यांच्या सहवासाच्या आठवणी फोटोच्या निमित्ताने ताज्या राहतात व स्वामी सोबत असल्याचा भास नव्हे तर सोबतच आहेत ही अनुभूती त्यांच्या सर्व भक्तांना येते.....
स्वामीजींचे कार्य फार महान होते त्यांचे हजारो भक्तगण आजही तन-मन-धनाने वार्षिक उत्सव त्याच भावाने साजरा करतात कारण स्वामीजी हयात असताना नेहमी म्हणत असत आपण आहो म्हणून कार्य होते व आपण नसल्यानंतर कार्य होणार नाही असे नसतेच भगवंत कोणत्या ना कोणत्या रूपाने ते कार्य अनंत दृश्य ,अदृश्य हाताने करून घेते शेवटी आपली श्रद्धा ही महत्त्वाची आहे.....
ब्रह्मलीन संत अक्षयानंद महाराज हे चालते बोलते देवच होते त्यांनी कधीही कोणाकडून एक रुपयाची अपेक्षा केली नव्हती परंतु त्यांच्या हातून महान कार्य झाले त्याची फलश्रुती आजही पनवेल व अंबाशी येथील आश्रमात दिसून येते. स्वामीजींचे गोसेवा ,अन्नदान व संतसेवा अशा सेवेवर त्यांचा जास्त जोर होता व तो आजही त्यांचे भक्तगण त्यांच्या मार्गदर्शनावर कार्य पार पाडत आहेत.....
स्वामीजींच्या आश्रमातून आजपर्यंत कोणीही भुकेला गेलेला नाही व त्यांच्या नावावर हजारो भक्तगण आपापल्या परीने सेवा कार्य करतात ही वाखण्याजोगी बाब आहे....
स्वामीजींना मानणारा वर्ग विदर्भातच नव्हे तर कोकण भागातही मोठ्या प्रमाणात आहे कोकण विभागातील त्यांचे हजारो भक्तगण आहेत त्यांचं खूप मोठं योगदान पनवेल आश्रम व अंबाशी आश्रम येथे आहे व आमच्यासारखे जे स्वामीजींचे भक्त आहेत त्यांना ही मंडळी सतत संपर्कात राहून विचारत असते की कुठलेही काम असलं तर आम्हाला सांगा व ते नेहमी सहकार्य करतात त्यांच्यात कुठलाच अहंभाव नसतो स्वामीजींचे शरीर दीड वर्ष झाले शांत झाले त्यानंतर सर्व छोटे-मोठे कार्यक्रम स्वामीजींच्या आशीर्वादाने भक्तगणांच्या सुरळीत सुरू आहेत स्वामीजींच्या सर्व भक्त मंडळीत एकोपा असून कुठलाही गैरसमज कोणी पसरवला तरी स्वामीजींची भक्त मंडळी त्या विषयावर लक्ष देत नाहीत कारण सर्वजण भक्तमंडळी देव देश धर्मासाठी कार्य करतात व असे धार्मिक कार्यकर्त्यांना थोडेफार कमी बुद्धीच्या विचारसरणीला दुर्लक्ष करणे हीच धार्मिक कार्याची फलश्रुती होय......
शेवटी सांगण्यासारखे एकच आहे साधुसंत, मंदिर हे हिंदू धर्माचे बलस्थान आहे.... त्यामुळे अशा कार्यात सहकार्य केले पाहिजे