कारंजा :-(जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे कडून)
कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आ. राजेंद्र पाटणी साहेब यांच्या शुभ हस्ते कारंजा शहरातील हद्दवाढ क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा शहर अध्यक्ष ललित चांडक होते.भाजपा शहर अध्यक्ष कारंजा, प्रमुख अतिथी भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे होते.कारंजा नगर परिषदचे अभियंता घोगरे होते. कार्यक्रमांत सर्वश्री- कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाटणी साहेब, भाजपा शहर अध्यक्ष ललित चांडक, भाजपा तालुका अध्यक्ष डॉ राजीव काळे, भाजपा जैन प्रकोष्ठचे ज्ञायक पाटणी, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कानकीरड, शहर सरचिटणीस शशी वेळूकर, भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष अमोल गढवाले, भाजपा प्रदेश सदस्या सौ.प्राजक्ता माहीतकर, राहुल रविराव, सविज जगताप, संदिप काळे, समीर देशपांडे,मोहन पंजवाणी , प्रसाद देशमुख , सौ.शारदाताई बांडे सौ.शुभांगीताई पिंपळे, ललित तिवारी आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. तसेच विविध ठिकाणच्या भूमिपूजन प्रसंगी तेथील स्थानीक मान्यवर सुद्धा व्यासपिठावर उपस्थित होते.

या मान्यवरांच्या उपस्थितीत खालील कामाचे भूमिपूजन संपन्न झाले.(1) सकाळी 8.30 वाजता शिंदे नगर येथे कारंजा येथील शिंदे नगर येथे मंगरुळपिर रोड ते दहातोंडे व मोरे यांच्या घराकडे रस्ता डांबरीकरण व दोन्ही बाजूने नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत 82.48 लक्ष रुपये या कामाचे (2) सकाळीं 9 वाजता कारंजा येथील टीएमसी कॉम्प्लेक्स येथे कारंजा येथील मंगरूळपीर रोड टीएमसी-2 कॉम्प्लेक्स ते गांजरे ते राठोड यांच्या घराकडे डांबरी करण व नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत 75.76 लक्ष रुपये या कामाचे (3) सकाळी 9.30 वाजता कारंजा येथील रवी नगर येथे कारंजा येथील रवी नगर ओझा यांच्या घरापासून ते गुलालकरी यांच्या घरापर्यंत डांबरीकरण करणे डांबरीकरण करणे अंदाजे किंमत 69.38 लक्ष रुपये या कामाचे,(4) सकाळी 10.30 वाजता यशोदा नगर येथे कारंजा येथील यशोदा नगर येथे लाहोरे ते यशोदा 3च्या आडव्या रस्त्यापर्यंत नाली बांधकाम व रस्ता काँक्रीटीकरण करणे अंदाजित किंमत 51.30 लक्ष रुपये या कामाचे,(5) सकाळी 10.30 वाजता कारंजा येथील यशोदा नगर येथे राहुल गावंडे ते यशोदा 3च्या आडव्या रस्त्यापर्यंत नाली बांधकाम व रस्ता काँक्रीटीकरण करणे अंदाजित किंमत 51.44 लक्ष रुपये या कामाचे (6) सकाळी 10.30 वाजता यशोदा नगर येथे येथील यशोदा नगर भाग - 2 येथे वैद्य ते होनराव यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे अंदाजित किंमत 51.98 लक्ष रुपये,(7) सकाळी 10.30 वाजता यशोदा नगर येथे कारंजा येथील यशोदा नगर भाग 1 मध्ये भगत वेल्डिंग ते वैद्य यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे अंदाजित किंमत या कामाचे,(8) सकाळी 11 वाजता कारंजा येथील सहारा कॉलनी येथे सहारा गेट ते गुलाबराव वरघट यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम व काँक्रीटीकरण करणे अंदाजित किंमत 71.02 लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन संपन्न होत आहे(9) सकाळी 11.30 वाजता कारंजा येथील ऋषी तलावाचे खोलिकरण करणे या कामाचे उदघाटन या सर्व कामाचे भूमिपूजन आमदार राजेन्द्र पाटणी सह अन्य मान्यवराचे उपस्थितीत पार पडले.
कार्यक्रमास विविध भागातील मान्यवर व नागरीक सर्वश्री श्रीकांत जाधव, व्यवहारे सर, विजय राऊत,सुभाष चौधरी, राहुल रवीराव , गुड्डू जयस्वाल, श्रीवास्तव मेजर, सतीश गिरमकार, परमेश्वर व्यवहारे, श्रीवास्तव, प्रकाश चौधरी, रामेश्वर बाकल, संदीप चंदनकर, राजभाऊ घोगरे, विकास राऊत, पुरुषोत्तम चौधरी, सचिन जाधव, सतीश ठाकरे, मदन पुणेवार, साहेबराव आडे,यशोदा नगर येथे दिनेश वाडेकर, विजय राऊत, हर्षल काटोले राजीव मुंगणकर, संजय लहानकर, अंकुश भगत, राहुल राठोड, शुभम पंडीत, नरेंद्र गावंडे, हार्दिक सोळंके, विवेक शिंदे, खोपे
शिंदे नगर - प्रल्हाद असलमोल ,बाबू पाटिल चौधरी, भीमराव कोळकर, अतुल धाकतोड ,वाघ टेलर, संजय खानबरड,राम देशमुख, अमित संगेवार, देवा असलमोल, बाबु उसरोटे, मारुती खुरसुडे,सचिनकाळे, गोलू तिलगम, सागर मोखडकर,शुभम कुटे,अमोल भागवत इत्यादीसह अन्य मान्यवर उपस्थित होते. नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.असे वृत्त प्रसार माध्यमाला मिळाल्याचे महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....