वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) दिवंगत प्रधानमंत्री स्व.राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात सद्भावना दिवसानिमित्त प्रतिज्ञा घेण्यात आली. स्व.राजीव गांधींच्या स्मृतींप्रसंगी सद्भावना दिवस साजरा केला जातो. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी स्व.राजीव गांधींच्या प्रतिमेचे पूजन करून पूष्पहार अर्पण केला. यावेळी उपस्थितांना सद्भावना दिनानिमित्त प्रतिज्ञा दिली. उपजिल्हाधिकारी मोहन जोशी, तहसीलदार राहुल वानखेडे,जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार,नायब तहसीलदार सविता डांगे,सुनील घोडे,विधी अधिकारी महेश महामुने,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत,लेखाधिकारी युसुफ शेख,विवेक नालट,सुनील कराळे,संगीता कराळे,भूषण तिलगम, सुधाकर गोगरकर,शरद भाग्यवंत, प्रमोद वानखेडे,गजानन कुऱ्हाडे, गजानन उगले,शीतल पावडे,संगीता कराळे,रचना परदेशी,आशा उगलमुगले यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सद्भावना दिनानिमित्त घ्यावयाच्या प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन केले.
“मी अशी प्रतिज्ञा करतो/ करते की, मी जात,वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता, सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन.मी
आणखी अशी प्रतिज्ञा करतो/करते की,आमच्यामधील सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करुन व संविधानिक मार्गाने सोडवीन.” अशी प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांनी घेतली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....