कारंजा (लाड) : भाजपा युवानेते गोलुभाऊ उपाख्य देवव्रत डहाके यांच्या वाढदिवसानिमित्त, मित्रपरीवाराकडून आज शनिवार दि. १७ मे २०२५ रोजी, सभापती निवास,कृषी उत्पन्न बाजार समिती,आठवडी बाजार कारंजा येथे अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती मिळाल्याचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले.याबाबत अधिक वृत्त असे की,भाजपा युवा नेते गोलूभाऊ उपाख्य देवव्रत प्रकाशदादा डहाके समाज सेवेच्या सेवाव्रती कार्यात सक्रिय युवानेते म्हणून ओळखले जातात.शिवाय त्यांनी मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत,कारंजेकरांच्या लाडक्या माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या,कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या पहिल्या आमदार श्रीमती सईताई प्रकाशदादा डहाके यांच्या निवडणुकीसाठी मतदार संघात युवकांची फार मोठी फळी उभी करून,प्रचाराची धुरा सांभाळून त्यांना निवडून आणण्याची फार मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडली होती.सद्यस्थितीत त्यांच्या मनमिळाऊ, सहनशिल,हजरजवाबी, कार्यतत्पर,विश्वासू प्रवृत्तीमुळे कारंजेकरांचे आशास्थान म्हणून त्यांचेकडे पाहिले जात आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने, स्थानिक स्वराज्य संस्था,जिल्हा परिषद,नगर पालिका निवडणूका घेण्याचा मार्ग मोकळा केल्या मुळे,कारंजा मानोरा तालुक्यातील मतदार त्यांचेकडे जिल्हा परिषदेचे भावी नेते म्हणून पहात आहे.व त्यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी.असा आग्रहही होत आहे.त्या पाश्वर्भूमिवर त्यांच्या आज रोजी,शनिवार दि.१७ मे २०२५ ला होणाऱ्या त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याकडे पाहिले जात आहे.असे वृत्त ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक संजय कडोळे यांनी कळवीले आहे .