कारंजा:- दिनांक 19 जुन रोजी कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते विकास पुरुष आमदार मा. राजेंद्र पाटणी यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका भाजपा ,शहर भाजपाच्या वतीने कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष ललित चांडक, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ राजीव काळे,भाजपा उपाध्यक्ष राजीव भेंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊसाहेब लहाने, रुग्णालय अधीक्षक डॉ.सोळंके, वैद्यकीय अधिकारी डॉ सौ.उपाध्ये,महिला मोर्चा तालुका अध्यक्ष सौ.शारदाताई बांडे,महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ.तिवारी,शहर सरचिटणीस शशी वेळूकर, युवा मोर्चा पदाधिकारी सौ. मेघा बांडे, पंचायत समिती सदस्य शुभम बोनके, अक्षय देशमुख, पं.समिती सदस्य दिनेश वाडेकर, मोहन पंजवाणी, युवा मोर्चा अध्यक्ष मंगेश धाने, ललित तिवारी, चिटणीस सुरेश गिरमकार, चिटणीस अशोक रोकडे, सौ. अनिता तोरसे ,संजय लहानकर, सोशल मीडिया युवा मोर्चा स्वप्निल चौधरी, विजय पाटील राऊत, मेजर जाधव, प्रसाद देशमुख, हर्षल काटोले, किशोर धाकतोड, अतूल धाकतोड, भाजपा शहर उपाध्यक्ष मनोज शिवाल, गजानन जाधव, रहिमान गारवे इत्यादीसह अन्य कार्यकर्ते तसेच अन्य वैद्यकीय अधिकारी , रूग्णालय कर्मचारी उपस्थित होते. असे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा पाटणी यांचे स्वीय सहाय्यक संजय भेंडे यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळविले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....