कारंजा : 'प्रशिक ग्रामिण पतसंस्था' ही कारंजा तालुक्याच्या 'सहकार व बँकीग' क्षेत्रातील अग्रणी संस्था म्हणून ख्याती प्राप्त असून,नेहमीच शेतकरी,शेतमजूर,ग्रामस्थ, खातेदार व ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली आहे. शिवाय 'प्रशिक' च्या नावावर 'वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड' मध्ये 'विश्वविक्रम' नोंदविल्या गेलेला असून पतसंस्थेच्या प्रामाणिक, विश्वासू,शिस्तप्रिय,पारदर्शी कारभारामुळे संस्थेला बँकिंग क्षेत्रातील अनेक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत.यापुढे सुद्धा "आपण आपल्या खातेदार ठेवीदार यांना जास्तित जास्त विश्वासार्ह सेवा देणार असून,आपल्या संस्थेची आर्थिक स्थिती अधिकाधिक मजबूत करणार असून सभासद केन्द्रीत कार्य प्रणाली राबवून संस्थेच्या सर्व सभासदांना नवनविन लाभ व सोयीसुविधा देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे" संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आकाश कऱ्हे यांनी सांगितले. 'प्रशिक' संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संचालकांच्या बैठकीत आपले मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते. 'प्रशिक' च्या नवनियुक्त संचालकांची पहिली सभा दि.२३ सप्टेंबर २०२५ रोजी सहाय्यक निबंधक कार्यालयात झाली.या सभेत संचालकांकडून एकमताने 'आकाश भास्करराव कऱ्हे'यांची 'प्रशिकचे' नवे अध्यक्ष म्हणून तर 'पांडूरंग मोतिराम भगत' यांची उपाध्यक्ष म्हणून 'बिनविरोध' निवड करण्यात आली.यावेळी सर्व संचालकांनी नवनिर्वाचित अध्यक्ष आकाश कऱ्हे आणि उपाध्यक्ष पांडूरंग भगत यांच्या निवडीचे स्वागत करून त्यांचे अभिनंदन करीत त्यांना यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.या संदर्भात अधिक वृत्त असे की, 'प्रशिक' ग्रामिण सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाकरीता नुकतीच दि. ०७ सप्टेंबर २०२५ रोजी निवडणूक पार पडली.या निवडणुकीत आपल्या विश्वासार्ह व पारदर्शी व्यवहारामुळे संचालकांच्या 'विकास पॅनल' ने बहुमताने दणदणीत विजय प्राप्त केला. निवडणूकीमध्ये रविन्द्र काशीनाथ रामटेके,आकाश भास्करराव कऱ्हे,पांडूरंग मोतिरामजी भगत,आशिष माणिकलाल बंड,ओंकार श्रीरामजी पाढेण,गुलाबराव चंपतराव साटोटे,कृष्णराव विठ्ठलराव राऊत,मेघराज मधुकरराव जुमळे,प्रशांत नारायणराव काळे,सौ.सुनिता दिपक उके,डॉ.सौ.अनघा आनंद उकर्डे या सभासदांनी बहुमतानी विजय प्राप्त केला.'विकास पॅनल'च्या विजयाबद्दल पतसंस्थेचे भागभांडवलदार,खातेदार, ठेवीदारामध्ये आनंद व उत्साह व समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्यामध्ये नवचैतन्य पहायला मिळत आहे.