वाशिम : दिनांक 10 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांवरील अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाढीव टप्पा अनुदान लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासोबतच अघोषित शाळा व तुकड्यांना 20 टक्के अनुदान, सैनिक शाळेतील तुकड्यांना वाढिव टप्पा अनुदान इत्यादी निर्णय घेण्यात आले. या निर्णयांसाठी अमरावती विभागाचे कर्तव्य तत्पर शिक्षक आमदार माननीय किरणरावजी सरनाईक यांनी सतत पाठपुरावा केला होता. तसेच सभागृहामध्ये अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले होते. शिक्षक समन्वय संघाच्या वतीने मागील 56 दिवस आझाद मैदान मुंबई येथे हुंकार आंदोलन सुद्धा करण्यात आले होते. या सर्व प्रयत्नांची, परिश्रमाची फलश्रुती म्हणजे कालचा निर्णय होय. त्या निमित्य शिक्षक समन्वय संघ वाशिम च्या वतीने तसेच विनाअनुदान कृती समितीच्या वतीने शिक्षक आमदार किरण रावजी सरनाईक साहेब यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.या सत्कार समारंभाला माननीय किरणरावजी सरनाईक साहेब सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रशांत कव्हर,दिगंबर गुडधे, हेमा सोमटकर मॅडम, जाधव सर ,तथा त्यांचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने शाल श्रीफळ व बुके देऊन श्री किरण रावजी सरनाईक यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनूणे सर यांनी केले. यावेळी दिगंबर गुडधे, प्रशांत कव्हर, हेमा सोमटकर, जाधव सर,पिस्कटवार इत्यादींनी आपले मनोगते व्यक्त केली. सत्काराला उत्तर म्हणून किरणरावजी सरनाईक यांनी सुद्धा आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले व भविष्यामध्ये शिक्षकांच्या कुठल्याही समस्यासाठी आपण सदैव संघर्ष करू लढू आणि जिंकू अशी ग्वाही उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनींना दिली. यावेळी आम्रपाली कोल्हे मॅडम, संदीप गोटे सर,गोपाल शेवाळे,पिस्कटवार सर, भगत मॅडम, लहाने मॅडम, जमदाडे सर, चव्हाण सर, कराळे सर, सैनिक शाळेचे वानखेडे सर,गावंडे सर, राऊत मॅडम, ढोबळे सर ,पांडे सर, पडघान सर, सुर्वे मॅडम, शिंदे मॅडम ,तथा बहुसंख्य शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अनिल मडके यांनी केले तर आभार प्रा प्रशांत कव्हर सर यांनी मानले