शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेली आरमोरी तालुक्यातील हितकरिणी उच्च माध्यमिक विद्यालय आरमोरी या विद्यालयाची ओळख आहे त्या विद्यालयात आयुष्यातील प्राध्यापक म्हणून 32 वर्ष सेवा करणारे मराठी विषयावर प्रभुत्व मिळविणारे,मराठी विषयात शिकवीत असतांना नऊ रसांना फुलविणारे श्री दिवाकर जी कुथें यांचा दि.31जुलै 2023 ला सेवानिवृत्ती समारोपीय कार्यक्रम विद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.
या सेवानिवृत्ती समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष कांशीरामजी शेबे शाळा व्यवस्थापन समिती, सदस्य धोटे,प्रमुख अतिथी पाचपांडे सर,सौ.पाचपांडे ,सत्कार मूर्ती श्री डी. जी.कुथें, सौ कुथें, प्रमुख पाहुणे प्राचार्य फुलझेले सर,पर्यवेक्षक बहेकर सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन वाणिज्य शाखेचे प्राध्यापक भाग्यवान मेश्राम,प्रास्ताविक कला शाखेचे प्राध्यापक लाकडे ,मनोगत विज्ञान शाखेचे प्राध्यापक संदीप प्रधान,आभार वाणिज्य शाखेचे प्राध्यापक रुमदेव सहारे यांनी केले.कार्यक्रमाला प्राध्यापक राजू दोनाडकर,प्राध्यापक सेलोकर,प्राध्यापिका रुपाली शेंडे,प्राध्यापिका साळवे,प्राध्यापिका दोनाडकर,प्राध्यापिका बुल्ले तसेच माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि एन.सी.सी.कडेड यांनी सहकार्य केले.