कारंजा लाड -- कोल्हापूर जिल्ह्यातील जैन समाजाच्या सातशे वर्षापासून अधिकची परंपरा असलेल्या नांदणी मठातील महादेवी हत्तीनीला अंबानीच्या गुजरात येथील वनतारा येथे नेण्याचा निर्णय अतिशय दुःखद आहे. हा निर्णय जैन समाजाच्या भावनांशी खेळ असुन अंबानी सारख्या बड्या उद्योजकांच्या मुलाचा हट्ट पुरविण्यासाठी हा सर्व खेळ केला जात आहे
जैन संस्कृतीचा भाग असणाऱ्या तिच्यासारख्या अनेक नाती जोडणाऱ्या प्राण्यांसाठी न्याय व करुणा या दोन्ही तत्वांना एकत्र ठेवून निर्णय घेण्याची गरज असल्याचे सांगत या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी या निवेदनाच्या माध्यमातून दिगम्बर जैन महासमिती कारंजा लाड संभाग ने जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष [ राज्यमंत्रिपद दर्जा ] ललीत जी गांधी यांच्या मार्फत सरकार ला केली आहे.
पुढे निवेदनात नमूद केले आहे की राज्यात गेल्या 40 वर्षापासून ' माधुरी ' नावाच्या हत्तीनीने केवळ एक प्राणी म्हणून नव्हें तर श्रध्देच्या प्रेमाचा व संस्कृतीचा भाग म्हणून आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे ती केवळ नांदणी मठातच नव्हें तर परिसरातील ग्रामीण भागातील हजारो लाखो गोरगरीब जनतेच्या हृदयात स्थान मिळविले आहे. पंचकल्याणक महोत्सव असो अथवा धार्मिक उत्सव, आठवडी बाजार, लहानग्यांशी खेळणी सारखी मैत्री वृध्दांच तिच्यावरच असलेल वात्सल्य व प्रेम अशा अनेक रुपात माधुरी जैन समाजातील प्रत्येक कुटुंबाचा भाग झाली आहे.
जैन धर्माचा पायाच मुळात 'अहिंसा 'आहे अगदी छोट्याच्या मुंगी ला सुध्दा जगण्याचा अधिकार आहे कळत नकळत ती पायाखाली येता कामा नये हा उदात्त विचार घेऊन जैन समाज प्रादाक्रांत करीत आहे जिथे सुक्ष्म मुंगी चा विचार केला जातो तिथे महाकाय हत्तीनी ला त्रास देण्याचा विचार ही मनात कसा येईल परंतु पेटा या विदेशी संस्था ने दबावात येऊन हा निर्णय घेतल्याचे या निवेदनात नमूद केले आहे
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की मा. न्यायालयाच्या निर्णयामुळे ही कार्यवाही झाली याची कल्पना असुन न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदरच करतो. परंतु आम्हाला खात्री आहे की राज्य सरकारला विशेषत: आपल्या सारख्या संवेदनशील नेतृत्वाला या निर्णयातील मानवी व प्राणी मात्रामधील भावनिक नात्याचे गांभीर्य नक्कीच जाणवेल
माधुरीवर मनापासून अगदी अंतःकरणापासून प्रेम करणाऱ्या आणि तिच्या प्रत्येक हावभावाशी जोडल्या गेलेल्या हजारो जैन अजैन लोकांची ही व्यथा आहे.
शेवटी आपणास दिगम्बर जैन महासमिती कारंजा लाड संभाग च्या वतीने विनंती आहे की शासनाने याबाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन योग्य तो निर्णय घ्यावा.
ललित जी गांधी यांना निवेदन सादर करते वेळेस दिगम्बर जैन महासमिती चे कारंजा लाड संभाग चे अध्यक्ष ॲड संदेश माणिकचंद जिंतुरकर, सचिव कविश गहाणकरी ,प्रदेश उपाध्यक्ष आशुतोष जोहरापुरकर, प्रदेश सदस्य नितीन बुरसे, प्रकाश सरोदे , वंदनाताई मोहाळे, अमोल काळे, प्रफुल्ल बांनगावकर, सौरभ डोळस , माजी तहसीलदार चंदाताई खंडारे व रितेश मिश्रीकोटकर उपस्थित होते.
[ हत्ती सारख्या धार्मिक व सांस्कृतिक प्रतिक असलेल्या प्राण्यांसाठी राज्य सरकार कडुन स्वतंत्र धोरण आखले जावे जे धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, पर्यावरणविषयक नैतिक व अनैतिक पैलु लक्षात घेऊन असे निर्णय घेतांना मार्गदर्शक ठरेल व नागरिकांच्या भावनांना ही ठेच पोहोचणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचे धनी असुन माधुरी सारख्या अनेक जाती जोडणाऱ्या प्राण्यांसाठी न्याय व करुणा या दोन्ही तत्वांना एकत्र ठेवून जैन समाजाला न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने
निर्णय घेतील अशी आशा आहे ]
संदेश माणिकचंद जिंतुरकर
अध्यक्ष दिगम्बर जैन महासमिती कारंजा लाड संभाग
आपल्या प्रतिक्रिया द्या....