खासगी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सने स्मारकासमोर वळण घेताना एका पादचाऱ्यास चिरडले. ही घटना २५ जून रोजी दुपारी एक वाजता घडली. होमराज अर्जुन हाडगे (वय ४८, रा. कोकडी, ता. देसाईगंज) असे मृताचे नाव आहे. ते दिव्यांग होते व सात-आठ वर्षापासून भिक्षा मागून उदरनिर्वाह भागवत होते कौशल भुखन यादव (36) असे हुतात्मा वाहनचालकाचे नाव असून, तो छत्तीसगडचा आहे. चंद्रपूरहून छत्तीसगडकडे निघालेल्या ट्रॅव्हल्सने (सीजी ०८ के १९०१) होमराज यांना धडक दिली. चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उपनिरीक्षक सुजाता भोपळे तपास करीत आहेत.