झाडिपट्टी रंगभूमीच्या पटलावर आपल्या अभिनय कौशल्याने शेकडो नाटकांतुन तब्बल तीन दशके गाजवणाऱ्या पुजा बन्सोडचे निधन झाल्याच्या मन सुन्न करणाऱ्या बातमीने झाडिपट्टी रंगभूमीचे कलावंत सावरत नाही तोच दुसऱ्याच दिवशी परत एका स्ञी नाट्य कलावंताने किरायाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या करून रंगभूमीच्या मातीतून एक्झीट घेतल्याने झाडिपट्टी रंगभूमी पुरती हादरली आहे.
कुरखेडा तालुक्यातील चिचटोला येथील रहिवासी असलेली आनंदा प्रविण रामटेके (३५ वर्षे) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या स्ञी कलावंताचे नाव असुन ४ डिसेंबर २०२२ लाच तीचे गेव्हरा येथील प्रविण रामटेके याच्यासोबत लग्न झाले होते.आनंदा ही मागील एक वर्षापासून हनुमान वार्डात दिनकर रामटेके यांच्या घरी किरायाच्या खोलीत वास्तव्यास राहुन झाडिपट्टी रंगभूमीत नृत्यांगणा म्हणून कार्यरत होती.दरम्यान प्रविणशी लग्न झाल्यापासून दोघेही एकञच राहात होते. माञ २५ मे च्या सकाळी खोलीत पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेऊन लटकलेल्या स्थितीत आढळून आली.
याबाबत देसाईगंज पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.घटनेचा पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करून नातेवाईकांकडुन काही आक्षेपार्ह हरकत घेतली गेली नसल्याने प्रेत कुटुंबियांच्या सुपूर्द केले.आत्महत्येचे कारण माञ समजु शकले नसुन पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सुजाता भोपळे ह्या करीत आहेत.