२५ जानेवारीच्या राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनांमध्ये वाशिम जिल्ह्यातील ६ पर्यवेक्षक व १८ बि.एल.ओ.चा सत्कार संपन्न झाला. यात कारंजातील पर्यवेक्षक गोपाल खाडे ,बि.एल.ओ.अल्ताब पटेल
निशांत कचरे व योगेश घोडसाळ यांचाही त्यांनी केलेल्या उल्लेखनीय व उकृष्ठ कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे निर्देशानुसार दिनांक २५ जानेवारी,२०२४ रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.सदर कार्यक्रमध्ये सन-२०२३ या कालामध्ये मतदार नोंदणी, दुरुस्ती,वगळणी यासंबधी उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या ६ पर्यवेक्षक व १८ बीएलओ यांचा सत्कार जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये करण्यात आला.२५ जानेवारी हा दिवस
राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.या दिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.लोकशाहीत मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व काय आहे,तो हक्क बजावल्याने काय परिणाम होऊ शकतो, मतदारांची भूमिका कशी महत्त्वाची ठरु शकते याबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता करण्यासाठी दरवर्षी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो.जगातली सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असलेल्या भारताची लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी मतदान कसं महत्त्वाचं आहे हे या दिनाच्या निमित्ताने सांगितलं जातं.नागरिकांनी आपल्या मताचा योग्य प्रकारे वापर केला तर योग्य प्रतिनिधी निवडून जाऊ शकतात आणि त्या माध्यमातून लोकशाही बळकट होऊ शकते. मतदानाच्या हक्काचा वापर करत देशातील नागरिक त्यांच्या भविष्यासाठी योग्य अशा प्रतिनिधीची निवड करु शकतील.सन २०११ पासून देशात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.या दिवशी केंद्र तसेच राज्य सरकारकडून अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.एक मतदार म्हणून देशातील नागरिकाला जेव्हा हा हक्क मिळतो, तेव्हा त्यासोबत एक जबाबदारीही येते,ती म्हणजे लोकशाही टिकवण्याची जबाबदारी. आपल्या देशात १८ वर्षे पूर्ण केलेल्या आणि मतदार यादीत नाव असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मत देण्याचा अधिकार आहे. धर्म, जात, वर्ण, संप्रदाय अथवा लिंग या निकषांवर भेदभाव न करता कुणालाही हा अधिकार बजावता येऊ शकतो.वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनांमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाशिम च्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वाशिम बुवणेशवरी एस.
निशांत कचरे व योगेश घोडसाळ यांचाही त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.पर्यवेक्षक गोपाल खाडे बि.एल.ओ.अल्ताब पटेल,निशांत कचरे व योगेश घोडसाळ यांनी कारंजाचे उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे तहसीलदार कुणाल झाल्टे निवडणूक नायब तहसीलदार लक्ष्मण बनसोडे यांच्या मार्गदर्शनात आपले उल्लेखनीय काम केले.