कारंजा:- येत्या ऑक्टोबर मध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार असल्याची चर्चा राज्यभर होत असून यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. सर्वच पक्ष विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागले आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडु यांनी सुद्धा विधानसभा निवडणुका ताकदीने लढणार असल्याचे सांगितले असल्याने राज्यातील प्रहार कार्यकर्त्यात उत्साह निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील विस विधानसभा
मतदारसंघात प्रहार उमेदवार देणार असून कारंजा / मानोरा विधानसभा मतदार संघातील जागेवर पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमेंद्रभाऊ ठाकरे निवडणूक लढण्यास इच्छुक असून आपण कारंजा / मानोरा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढणार असल्याचे हेमेंद्रभाऊ ठाकरे यांनी म्हटले आहे.
कारंजा/ मानोरा मतदारसंघात मागील अनेक वर्षापासून एकनिष्ठपणे काम करणाऱ्या हेमेंद्रभाऊ ठाकरे यांच्याकडे पक्षाने जिल्हाध्यक्षाची जबाबदाऱी सोपवली.
काम करीत असताना विविध आंदोलने हेमेंद्रभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. प्रत्येक वर्षी विकास कामे व शेतकऱ्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत सामाजिक संदेशही हेमेंद्रभाऊ ठाकरे यांनी दिला आहे.
सन २०१४ मध्ये हेमेंद्रभाऊ ठाकरे हे जिल्हा परिषद कृषी सभापती पदी असतांना त्यांनी कारंजा मतदार संघात प्रत्येक सर्कल मध्ये जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्याचे तात्काळ निवारण केले. तसेच शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषद मार्फत अनेक योजना राबविल्या आणि त्या योजनांचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळावा म्हणून त्यात स्वतः लक्ष घातले.
तसेच मानोरा नगरपंचायतच्या अध्यक्ष पदी विराजमान झाले तेव्हा पासून मानोरा नगरीसाठी अनेक विकासकामे करण्यात आले व सातत्याने विकासकामे करने सुरुच आहेत.
विकास कामे करत असताना हेमेंद्रभाऊ ठाकरे हे नेहमीच गोर- गरीब जनतेचे,शेतकऱ्यांचे व शेतमजूरांचे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.
हेमेंद्रभाऊ ठाकरे यांचा दांडगा जनसंपर्क असून मानोरा त्यांचा बालेकिल्ला आहे तसेच त्यांचे मोठे बंधू अनुपभाऊ ठाकरे हे गेली २५ वर्षांपासून कारंजा येथे राजकारणात सक्रिय असून अखंडपणे निःस्वार्थ जनसेवा करण्यात ते व्यस्त असतात.त्यांचा कारंजा परिसरात दांडगा जनसंपर्क आहे आणि त्यांनी बरेचसे गोरगरीब जनतेचे, शेतकरी व शेतमजुरांचे निःपक्ष व निःस्वार्थपणे कामे केली आहेत. परिणामी येत्या विधानसभा निवडणुकीत हेमेद्रभाऊ ठाकरे यांचा विजय निश्चित आहे.मानोऱ्यातून श्री हेमेंद्रभाऊ ठाकरे तर कारंजातून अनुपभाऊ ठाकरे अशी दुहेरी ताकत लागत असल्याने भावी आमदार हेमेंद्रभाऊ ठाकरे हे निश्चित असल्याचे सर्वसामान्य जनमानसात बोलल्या जात आहे.
कारंजा/मानोरा विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत घराणेशाहीची मक्तेदारी राहिलेली आहे परिणामी मतदारसंघाचा विकास खोळंबला आहे. मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी प्रहार सारखा पक्ष व हेमेंद्रभाऊ ठाकरे सारखे खंबीर व निर्भीड नेतृत्व मतदारसंघास लाभणे आवश्यक आहे असा सुरु मतदार बांधवांचा ऐकायला मिळतो.हेमेंद्रभाऊ ठाकरे यांनी सुद्धा मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधायचा ध्यास घेतला असून कारंजा/मानोरा विधानसभा क्षेत्रातील जनता ही आपल्या पाठीशी सदैव उभी राहील असा विश्वास हेमेंद्रभाऊ ठाकरे यांना आहे. आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी कारंजा/मानोरा प्रहार पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.प्रहार जनशक्ती पक्षाला व हेमेंद्रभाऊ ठाकरे यांना कोणीही हलक्यात घेऊ नये.
आपण पूर्ण ताकदीने कारंजा/मानोरा विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे हेमेंद्रभाऊ ठाकरे यांनी म्हटले आहे.