कारंजा : शहरात युवा तथा वयस्क यांना व्यायामाची प्रेरणा देणारा रफ अँड टफ ग्रुप दोन वर्षापासून कार्यरत आहे. ग्रुप चे सदस्य सतत वाढत असून, क्रीडा संकुलच्या मैदाना वर सकाळी 6 ते 7:30 वाजेपर्यंत वर्कआउट (व्यायाम ) व रनिंगचा सराव केला जात होता, त्याचा आज कारंजा मानोरा विधानसभेच्या आमदार सईताई प्रकाश डहाके यांच्या हस्ते समारोप करण्यात आला.
यावर्षी ग्रुप ने फेमिली समर केम्प २०२५ हा दि.21 मे ते 26मे पर्यत कारंजा क्रीडा संकुलच्या मैदानावर आयोजित केला होता,हा कॅम्प कारंजा तालुका क्रीडा अधिकारी व रफ अन्ड टफ ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहात राबविण्यात आला. या समर कैम्प मध्ये 250 सदस्यांनी आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. ज्यामध्ये लहान मुले मुली तरूण तरुणी तसेच जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या केम्प मध्ये वय वर्ष 8 ते 80 पर्यंतच्या लहान चिमुकल्यापासून ते जेष्ठ नागरिक यांची उपस्थिती लक्षणिय होती.
संपूर्ण आठवड्या मध्ये झुंबा डान्स,योगा, व्यायाम, अक्युप्रेशर चे व्यायाम तसे हास्य चे व्यायाम करत शरीर निरोगी व तंदुरुस्त राहण्याचे धडे गिरविन्यात आले. या यशस्वी समर कॅम्पचा समारोप
26 मे सोमवार रोजी करण्यात आला.
या समारोपिय कार्यक्रमा करीता अध्यक्ष म्हणुन आमदार श्रीमती सईताई डहाके यांची तर प्रमुख पाहुणे डॉ . राम गुंजाटे, मोरे एस टी महामंडळ कारंजा आगार व्यवस्थापक, सुभनावळ पोलीस उपनिरीक्षक व क्रीडा संयोजक पराग गुल्हाणे हे होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला भारत मातेच्या प्रतिमेस हारार्पण करून पुजन करण्यात आले नंतर कार्यक्रमाचे अध्यक्षा व प्रमुख पाहुण्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला
अध्यक्षीय भाषणात आमदार सईताई यांनी रफ ॲड टफ फिटनेस ग्रुप करत असलेल्या कार्याचे कौतुक केले व म्हणाल्या की क्रीडा प्रेमी व रफ अन्ड टफ ग्रुप च्या वतीने काही दिवसाअगोदर क्रीडा संकुल मध्ये सौदर्यकरण सोयी सुविधा व स्विमिंग टॅक बनविन्याची जी मागणी आपण केली होती त्या विषयावर वाशिम जिल्हाचे पालकमंत्री आमदार दत्ता भरणे यांच्याशी या कामाकरीता भरीव निधीबाबत सविस्तर सकारात्मक चर्चा केली असून येत्या महिना भरात वाशिम येथील टीम क्रीडा संकुलाच्या पाहणीकरीता येणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
तसेच दोन्ही पायांनी विकलांग असून अपंगत्वावर मात करणारे इंजिनिअर राउत सर यांनी आपल्या मनोगत मध्ये म्हणाले की कोणतेही संकट आले तरी जीवनातील सकारात्मकता संपवु नये, कारण जीवन हे सतत चालणारे असते.कारंजा आगार व्यवस्थापक मोरे व पोलीस कर्मचारी संदीप बरडे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल ठाकरे प्रास्ताविक राजु पवार तर आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक सुभनावल यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता रफ ॲन्ड टफ फिटनेसच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....