वाशिम : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात काम करणाऱ्या आकाशवाणीच्या जिल्हा वार्ताहर संघटनेच्या,महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी वाशीम येथील आकाशवाणीचे जिल्हा प्रतिनिधी सुनील कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.दिनांक 27 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे आकाशवाणी वार्ताहरांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती,या दरम्यान झालेल्या संघटनेच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. आकाशवाणी जिल्हा वार्ताहर संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी धाराशिव येथील जिल्हा वार्ताहर देविदास पाठक यांची तर कार्याध्यक्षपदी जळगाव येथील राजेश यावलकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधींनी यावेळी आगामी काळात करावयाच्या विविध विषयावर चर्चा केली.तसेच ह्या संघटनेची पुढील काळात घ्यावयाची भूमिका यावर विचार मंथन केले. सुनिल कांबळे हे वाशिम येथील अनुभवी,अभ्यासू,ज्येष्ठ पत्रकार असून त्यांच्या निवडीबद्दल वाशिम जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील त्यांचे चाहते व मित्रमंडळी कडून अभिनंदन होत आहे. असे वृत्त आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांनी कळवीले आहे.