विवीध शंकरपुर ग्राम पंचायत भेट विषयावर चर्चा करण्यात आली देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शंकरपूर ग्रामपंचायतला अनिकेत समाजकार्य महाविद्यायातर्फे क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. गावातील ग्रामसमिती, स्वच्छता व पावसाच्या पाण्याचे नियोजन, शुध्द पाणी , नागरिकांच्या आरोग्याची पावसाळ्यात घेतली जाणारी काळजी अश्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली सदर कार्यक्रमाला दादाजी वालदे सरपंच, शामराव तलमले सदस्य ग्रा. प, चंदुलाल वाघाडे, प्रीतम धोंडने, कपिल धोंडने, लिपिक हिवराज ठाकरे तर मार्गदर्शक डॉ. ए. आई थूल यांच्या मार्गदर्शनाखाली बी एस डब्लू भाग तीन चे विद्यार्थी कु. विद्या कडीखाये,विवेक तुलावी,संजय काटेंगे उपस्थित होते.