ब्रम्हपूरी तालुक्यातील खरकाडा येथील बाजीराव वाघधरे (वय 35 वर्ष) व किसन शेंडे (वय 60 वर्ष) हे दोघेही मागील काही महिन्यांपासून कॅन्सर या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. मात्र दोघाही रुग्णांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना वैद्यकीय उपचार घेतांना आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.
सदरची बाब खरकाडा येथील ग्राम काॅंग्रेस कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, विरोधीपक्षनेता, आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांना कळवताच त्यांनी दोन्ही कॅन्सरग्रस्तांना वैद्यकीय उपचार घेतांना आर्थिक हातभार लागावा म्हणून आपल्या स्वतः कडून आर्थिक मदत पाठवली.
सदरची आर्थिक मदत देतांना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, अनुसूचित जमाती सेलचे तालुकाध्यक्ष जगदीश आमले, ग्राम काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष रविंद्र ढोरे, ग्राम काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष योगेश्वर ढोरे, युवक काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल ठाकरे, तंमुस अध्यक्ष हिरामण मुळे, तुकाराम ठाकरे, भाग्यवान ढोरे, उपसरपंच ताराचंद पारधी, रामभाऊ आमलेवार, सोमेश्वर उपासे हे यावेळी उपस्थित होते.