अकोला; १४ एप्रिल २०२४ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य मतदार साक्षरता अभियानाचे ब्रँड अँबेसिडर व दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे यांनी बी.आर. हायस्कूल अकोला येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांना मतदानाची शपथ दिली . ज्येष्ठ नागरिकांना मतदान करताना येणाऱ्या अडचणी त्यांनी ऐकून घेतल्या . अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांना दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे मदतनीस दिला जाईल व त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष व्यवस्था संस्थेतर्फे केली जाईल .
ज्या ज्येष्ठ नागरिकांना अशी सोय हवी आहे त्यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या ९४२३६५००९० या हेल्पलाइन क्रमांकावर आपली नोंदणी करावी असे आव्हान डॉ.विशाल कोरडे यांनी केले* . संपूर्ण अकोला जिल्ह्यात डॉ.कोरडे मतदार साक्षरता अभियान यशस्वीपणे राबवित असल्याने ज्येष्ठ नागरिक संघाद्वारा त्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात कवी नारायण अंधारे यांनी मतदान जनजागृतीपर कविता प्रस्तुत केली.ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले संस्थेच्या प्रत्येक सामाजिक उपक्रमात ज्येष्ठ नागरिक संघ नेहमीच सक्रिय सहभाग नोंदवणार असे अभिवचन त्यांनी दिले* . मतदार साक्षरता अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष चंद्रकांत कुळकर्णी, सचिव प्राचार्य डॉ. सत्यनारायण बाहेती, सुनिता थत्ते, अभि विनायकराव पांडे, अतिरिक्त मुख्य सचिव फेस्कॉम, नारायण अंधारे अध्यक्ष अकोला जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती, चोथमल सारडा अध्यक्ष प्रादेशिक कृषी समिती, ना. मा. मोहोड उपाध्यक्ष विदर्भ पश्चिम विभाग, प्रमोद देशमुख सचिव जिल्हा समन्वय समिती, दिलीप पांडे, नाना मोहरिल,अशोक कुळकर्णी, माजी अध्यक्ष, संध्या संगवई, निशा कुलकर्णी, प्रा. सुरेश कुळकर्णी, प्रा. यादव वक्ते, कन्हैया चेन्निथला, मु ज निर्वाण, अंबादास तल्हार, बाळकृष्ण काळे , नेमिनाथ इंदाने डॉ. दिलीप इंगोले.दिव्यांग सोशल फाउंडेशन चे सदस्य अनामिका देशपांडे ,अस्मिता मिश्रा,सिद्धार्थ ओवे,गणेश सोळंके, अरविंद देव,विजय कोरडे व प्रतिभा काटे