अकोला - स्थानिक सेनगण दिगंबर जैन मंदिर शिवचरण पेठ येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री 1008 भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये सामुहिक संगीतमय महाआरती, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, सत्कार सोहळा, भव्य मोफत आरोग्य शिबीर व थॅलेसेमीया आजारावरील लहान मुलांसाठी भव्य रक्तदान शिबीर व मोफत औषधी वितरण तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे मॅडम, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये मॅडम, जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, अन्नपूर्णा माता फाऊंडेशनचे संचालक अन्नपूर्णेश पाटील, ग्रीन ब्रिगेडचे अध्यक्ष विवेकजी पारसकर, जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष कमलभाऊ खरारे, रविंद्र मांडवगडे, संतोष अग्रवाल, एलडीएन कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र नेरकर आदींची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमस्थळी मोफत आयुष्यमान भारत कार्ड तयार करुन देण्यात आले, सत्यसाई सेवा संघटनेतर्फे मोफत औषध व लहान मुलांसाठी प्रोटीन डब्ब्यांचे सुद्धा वाटप करण्यात आले. या आरोग्य शिबीरामध्ये अकोल्यातील नामवंत डॉक्टर्संनी आपली सेवा दिली यामध्ये किडनी रोग तज्ञ डॉ. अमोल भगत, गॅस्ट्रोलॉजीस्ट डॉ. परमेश्वर जुनारे, जनरल फिजीशियन डॉ. राम बिहाडे, स्त्री रोग तज्ञ डॉ. प्रिती राठी, दंत रोग तज्ञ डॉ. मंगेश दातीर, बाल रोग तज्ञ डॉ. स्वप्निल काजळे, अस्थि रोग तज्ञ डॉ. विक्रांत इंगळे, नेत्र रोग तज्ञ डॉ. राजेश इंगळे, जनरल फिजीशियन डॉ. शाम शर्मा, रुग्णसेवक आशिष सावळे, रक्ताचं नातं ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विजय गावंडे, साई जीवन ब्लड बॅंक व सत्यसाई सेवां ट्रस्ट अकोला