अकोला-- समाजातील मुलामुलींचे लग्न जुळवण्यासाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम परिचय मेळाव्याचे आयोजनात पुढाकार घेण्यासाठी 25वर्षापूर्वी अकोल्यात ज्येष्ठ सामाजिक ,सत्यशोधक कार्यकर्ते महादेवराव भुईभार यांचे अध्यक्षतेखाली पाटील बहुउद्देशीय सेवा समितीची स्थापना झाली. .2024 हे वर्ष समितीचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे पाटील बहुउद्देशी सेवा समिती व अकोला जिल्हा मराठा मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय उपवर युवक- युवती परिचय मेळाव्याचे आयोजन दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी अकोला जिल्हा मराठा मंडळ सभागृह रामदास पेठ अकोला येथे करण्यात आले आहे .
आयोजनासंदर्भात समितीचे कार्यलय गणेश झेरॉक्स ,सिव्हिल लाईन चौक येथे संपन्न झालेल्या बैठकीत पाटील बहुउद्देशीय सेवा समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार, सचिव श्रीकृष्ण विखे व अकोला जिल्हा मराठा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील,उपाध्यक्ष दिवाकर पाटील, सचिव प्रा.डॉ.विवेक हिवरे, डॉ. विनोद बोर्डे, श्रीकांत पाटील ,देविदास कोरपे, सुभाषराव पुंडकर, मनोहरराव महल्ले, बबनराव कानकिरड , महेंद्र पाटील ,रामेश्वर खोंड ,प्रशांत काळे यांचे सह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
दरवर्षीप्रमाणे भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी मराठा मंडळ अकोला येथे परिचय मेळावा आयोजित केला जातो. विदर्भासह शेजारच्या मराठवाडा,खांदेश, शेजारच्या मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर खंडवा ,छत्तीसगडमधील दुर्ग,रायपूर भागातील मराठा बांधव या मेळाव्यास आवर्जून हजेरी लावतात. रोप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने सर्व राज्यातील समाज बांधवांना या मेळाव्यासाठी निमंत्रित करणार असल्याची माहिती पाटील सेवा समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार व सचिव श्रीकृष्ण विखे यांनी दिली आहे.