कारंजा (लाड) : केन्द्रशासन आणि राज्यशासन मिळून दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त आणि वयोवृद्ध ज्येष्ठ नागरीकांना, सामाजिक न्याय विभागाच्या स्व संजय गांधी योजना विभागाकडून, स्व संजय गांधी निराधार योजना, स्व इंदिरा गांधी विधवा निराधार योजना,श्रावण बाळ योजनेचे तुटपुंजे का होईना ? परंतु दरमहा नियमित पणे निराधारांच्या बँक खात्यामध्ये अनुदान पाठवले जाते. परंतु सदरहू अनुदान बँकेतून काढण्या करीता योजनेचे लाभार्थी वयोवृद्ध, दुर्धरआजारग्रस्त, आंधळे आणि १००% अस्थिव्यंग असलेल्या लोकांना बँकेतून रक्कम काढण्या करीता गावखेड्यातून शहरात येण्याकरीता पायपिट करीत मोठी कसरत करावी लागते व त्यामुळे त्यांना प्रवासभाड्यासह मोठ्या हालअपेष्टांना सामोरे जावे लागते त्यामुळे कारंजा तहसिलचे तहसिलदार कुणाल झाल्टे साहेब यांनी निराधाराच्या ह्या गंभिर समस्येची दखल घेऊन शासन निर्णया प्रमाणेच,अशा लाभार्थी निराधाराना कारंजा डाक कार्यालयामार्फत घरपोच रक्कम देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी कारंजा येथील आदर्श जय भारत सेवाभावी संस्थेचे रोमिल लाठीया, डॉ ज्ञानेश्वर गरड, डॉ इम्तियाज लुलानिया आणि महाराष्ट्र अपंग संस्था कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केली आहे.