जाफराबाद:- जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील दिव्यांग आकाश भास्कर देशमुख यांना राज्यस्तरीय काव्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
त्याचप्रमाणे गुंधा (ता:-लोणार) येथील क्रांतिगुरू बहुउददेशीय सेवाभावी संस्थेमार्फत दिला जाणारा क्रांतिवीर लहूजी साळवे काव्य गौरव पुरस्कारासाठी त्यांची जालना जिल्हातून निवड करण्यात आली.
त्यादरम्यान गुंधा येथे सोमवारी आयोजित क्रांतिवीर लहुजी साळवे जयंती समोरह कार्यक्रमात दिव्यांग कल्याण विभागाचे राज्य अध्यक्ष व माजी मंत्री मा. श्री.आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
यावेळी आकाश देशमुख यांचे वडील भास्कर देशमुख तसेच त्यांची आई शारदा देशमुख उपस्थित होत्या.