आरमोरी:-
क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिन म्हणून ओडाखला जाणारा 9 ऑगस्ट मोठ्या उत्साहात आरमोरी शहरात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन शाखा आरमोरी, आदिवासी विद्यार्थी संघ शाखा आरमोरी, आदिवासी मूळ गोंडीयान जमाती समाज संघटना शाखा आरमोरी, आदिवासी हलबा हलबी व कव्वर समाज संघटना शाखा आरमोरी तसेच आदिवासी गोटूल समिती आरमोरी यांनी केले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 11:00 वाजता आदिवासी परंपरागत पद्धतीने आरमोरी येथिल गोटूल भूमी वडसा रोड बर्डी येथे आदिवासी देवी देवतांची पूजा करून करण्यात आली. त्यानंतर गडचिरोली रोडवर असलेल्या बंजारी माता वंजारी देवस्थान येथून आदिवासी समाज बांधवाची रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये आदिवासी ढोल व तिरपुडीचा वाद्य व डीजेवर वाजत असलेल्या गोंडी गीतावर गोंडी नृत्य नाचत असलेली तरुणाई ही आरमोरीकरासाठी विशेष आकर्षण ठरत होती. तर रॅलीत असलेली लहान मुले, मुली, महिला, युवक, युवतींना यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आले होते.
आदिवासी समाज ही या देशातील राज्यकर्ती जमात होती परंतु शिक्षण व दुरदृष्टीचा अभाव यामुळे या जमातीचा विकास खुंटला.समाजातील लोकांना विकासासाठी शिक्षणाची कास धरून शिक्षणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या संधीचे सोने करायला शिकने आवश्यक असल्याचे मत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी जागतिक आदिवासी दिना निमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यक्त केले.
त्यानंतर सेवानिवृत्त झालेले आदिवासी कर्मचारी व आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदराव गेडाम माजी आमदार आरमोरी, उद्घाटक डॉ. छाया उईके वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय आरमोरी, हरिरामजी वरखडे माजी आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र, डॉ. रामकृष्णजी मडावी माजी आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र, नीलकंठ मसराम अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी फेडरेशन आरमोरी, संजय टेकाम पीएसआय आरमोरी , शशिकांत मडावी संचालक राजपथ अकॅडमी आरमोरी, नरेंद्र कोकुडे गटशिक्षणाधिकारी आरमोरी, दिलीप घोडाम सामाजिक कार्यकर्ते. प्रकाश पंधरे मुख्यध्यापक म. गां. कन्या विद्यालय आरमोरी, सुरेंद्र बांबोडे अध्यक्ष प्रियदर्शनी सम्राट अशोक फोरम आरमोरी विश्वेश्वर दरो बाजिराव सयाम यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन साई दामोदर मंगल कार्यालय वडसा रोड बर्डी आरमोरी येथे करण्यात आले असून जागतिक आदिवासी दिनानिमित्त आरमोरी शहरातील व तालुक्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या आदिवासी समाज बांधवा करिता स्वादिष्ट जेवणाची सुद्धा सोय करण्यात आली होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवराज सयाम प्रदिप सिडाम संतोष मरस्कोले, हरेंद्र मडावी, विलास सिडाम, वसंत मडकाम, प्रेम सयाम, अशोक कोकुडे, किशोर कुमरे, सुभाष पेन्दाम, हरीश उसेंडी, अरविंद गावंडे, प्रविण कुळमथे, लोमेश मडावी, नकुल पेन्दाम, होमदेव तलाडे, मंदा मडावी, प्रा सुनंदा कुमरे, स्वरस्वती उसेंडी, मिना मसराम यांनी परिश्रम केले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....