भंडारा:-रस्ता ओलांडण्याच्या नादात बसने दुचाकी चालकाला धडक दिली. यात १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान फुलमोगरा राष्ट्रीय महामार्गावर घडली. सुशांत प्रशांत घरडे (१८) रा. अशोकनगर फुलमोगरा असे मृतकाचे नाव आहे. बस ही नागपूर आगाराची असून बस क्रमांक एम एच ४० वाय ५१४२ आहे. तरुण हा ओम सत्यसाई कला विज्ञान महाविद्यालय परसोडी (ठाणा) येथील विद्यार्थी होता. याबाबत जवाहरनगर पोलिसांची कारवाई सुरू होती.