कारंजा (लाड) : महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाकडून विकसीत करण्यात येत असलेले कारंजा तालुक्यातील "सोहोळ अभयारण्य" पर्यटकांकरीता खुले करण्यात आल्यास,कारंजा तालुक्यात एक चांगले निसर्ग पर्यटन केन्द्र होऊन,हजारो निसर्गप्रेमी, पशू पक्षी प्रेमी पर्यटकाची पाऊले सोहोळ अभयारण्याकडे वळून, पर्यटकाच्या आगमनामुळे परिसरातील स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल.तरी शासनाने सोहोळ अभयारण्याचे काम पूर्णत्वास नेऊन सदरहू अभयारण्य पर्यटकाकरीता खुले करण्याची मागणी होत आहे.