गोवा येथे आरंबोलमधील ओजस्वी पॅराडाईज हॉटेलमध्ये ईलना अध्यक्ष मा.परेशनाथजी यांचे अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष या.प्रकाशजी पोहरे व व्दितीय उपाध्यक्ष राज्यसभा सदस्य मा.विवेकजी गुप्ता व निवडणूक निर्णय अधिकारी श्री विजयजी बोंन्द्रीया यांचे प्रमुख उपस्थितीत ही सभा संपन्न झाली.यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष व इतरांची फेरनियुक्ती झाली.
या राष्ट्रीय कार्यकारिणीत माझी विश्वप्रभात संपादक व अनेक वर्षांपासून ईलना सभासद म्हणून(संजय देशमुख) नियुक्ती करण्यात आल्याने मा.प्रकाशभाऊ पोहरेसोंबत अकोल्याला माझ्या माध्यमातून हे पदाधिकारी दुसरं प्रतिनिधित्व मिळालेलं आहे.या सभेत वृत्तपत्रांच्या व निकरणासंबंधी चर्चा करण्यात आली.यावेळी नागपूरहून दैनिक राष्ट्रदुतचे व्यवस्थापकीय संपादक मा.शिव अग्रवाल,दैनिक राष्ट्रपत्रिकेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक,मा.क्रिष्णाजी नागपाल भोपाळ येथील कृषीजगतचे संपादक मा.विजयजी बोंन्द्रीया,सातारा येथून दै.जिव्हाळाचे संपादक मा.बाळासाहेबजी आंबेकर,सुप्रसिध्द कवी,चारोळीकार मा. अनंतराव खेळकर,बंगळूरू,कर्नाटक येथील विर राणी चन्नाम्माच्या संपादिका सौ.सरोजीनी आर्गे,व अनेक राज्यांतील ईलना पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.