अकोला; स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाचे संस्थापक अध्यक्ष व मतदार साक्षरता अभियान अकोला जिल्ह्याचे ब्रँड अँबेसेडर डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण अकोला जिल्ह्यात मतदार साक्षरता अभियानाला जनसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दि.१० एप्रिल २०२४ रोजी महावितरण कार्यालयात मतदार साक्षरता अभियानाचा कार्यक्रम संपन्न झाला.त्यावेळी मंचावर अग्रणी दूत डॉ.विशाल कोरडे, प्रभारी मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, कार्यकारी अभियंता ग्यानेश पानपाटील, व उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर उपस्थित होते.अकोला जिल्ह्यात मतदानात वृद्धी होण्यासाठी महावितरणा च्या ग्रामीण व शहरी भागातील कार्यालयातून जनसामान्यांना मतदानासाठी प्रेरीत करावे. आलेले ग्राहक यांना मतदानाचे महत्त्व पटवून द्यावे व महावितरण च्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना मतदानासाठी योग्य सुविधा मिळवून द्यावी असे आवाहन डॉ.विशाल कोरडे यांनी केले.*प्रभारी मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन च्या अभियानाचे कौतुक केले. महावितरण कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी आपल्या कुटुंबासह मतदान करतील असे आश्वासन त्यांनी दिले.लोकशाहि बळकट करणे व योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी जनतेने मतदान करावे असा संदेश ग्यानेश पानपाटील व अरुण शेलकर यांनी दिला. डॉ.कोरडे यांच्या मार्गदर्शनात उपस्थित सर्व कर्मचारी वर्गाने मतदानाची शपथ घेतली.मतदार साक्षरता अभियान धडाडीने राबवित असल्याने डॉ.विशाल कोरडे यांचा महावितरण कार्यालय अकोला तर्फे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला*. मतदार साक्षरता अभियानाच्या राष्ट्रीय उपक्रमासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशन चे सदस्य अनामिका देशपांडे, पुजा गुंटिवार, मेघा देशपांडे, अस्मिता मिश्रा, सिद्धार्थ ओवे,अंकुश काळमेघ, विजय कोरडे , गणेश सोळंके व महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.