भरधाव मारुती व्हॅगनार कारचे अचानक समोरिल उजव्या बाजुचे टायर फुटल्याने अनियंत्रित कार मार्गाच्या लगत असलेल्या झाडावर जावून आदळल्याने झालेल्या अपघातात, वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दोन चिमुकल्यांसह पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना,भंडारा जिल्ह्याच्या लाखांदुर-साकोली मार्गावरिल दांडेगाव फाट्याजवळ रविवारी दुपारी घडली.शालिनी चिंचेकर वय ( 70 ) वर्ष असे मृत वृद्ध महीलेचे नाव असुन,अभिषेक चिंचेकर (वय 27), कल्पना चिंचेकर (वय 44), प्रियंका काटनकर (वय 29) व हित काटनकर (वय 4) आणि सोनायना काटनकर वय दीड वर्ष असे अपघातातील गंभीर जखमींचे नावे असुन सर्व गडचिरोली येथील राहणारे आहेत. अपघाताची माहिती दिघोरी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून,घटनेचा पंचनामा करुन जखमींना त्वरित ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे उपचाराकरिता हलविले. मात्र जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने पाचही लोकांना ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहीती आहे.या घटनेची नोंद दिघोरी पोलिस स्टेशन येथे करण्यात आली आहे.