चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे अज्ञात करपा रोगाने नुकसान झाले असून पीक विमा कंपनीने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांनी काढलेल्या पीक विम्याची रक्कम १०० टक्के नुकसान भरपाई पीक विमा कंपनीने देण्यात यावे तसेच शासनाकडून शेतकऱ्यांना एकरी ५०,००० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची यावे अशी मागणी भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
आपल्या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठया प्रमनात आहे ह्या भागात सोयाबीन वर अज्ञात करपा रोगाने थैमान घातले असून सोयाबीन चे क्षेत्र पूर्णपणे पिवळे पडून सुकत आहे. यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. शासनाने एक रुपयात पीक विमा काढलेला आहे.कंपनीने तात्काळ याचे पंचनामे करून शासनाने १ रुपया भरून काढलेल्या पीक विम्याची १०० टक्के रक्कम नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना द्यावे. तसेच शासनाने सुद्धा शेतकऱ्यांना एकरी ५०,००० हजार रुपये आर्थिक मदत करण्याबाबत करीता सुमारे पाचशे ते सहाशे शेतकरी तसेच सुमारे ४०ट्रॅक्टर घेऊन एसडीएम कार्यालयावर मोर्चा आणला होता. सदर मोर्चाचे नेतृत्व नरेंद्र जिवतोडे यांनी केले असून निवेदन शासनाला पाठविण्यात येईल असे सांगितले.