आवळगावं येथील शेतामध्ये निंदन करायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आवळगांव शेत शिवारात आज मंगळवारला दु.२.०० वा. घडली.
प्राप्त माहितीनुसार,आवळगांव येथील धृपता श्रावण माेहुर्ले(वय ५५) ही महिला नेहमीप्रमाणे आज शेतावर गेली.शेतामध्ये काम करीत असताना मागेहुन आलेल्या वाघाने अचानक हल्ला करून काम करीत असलेल्या या महिलेला जागीच ठार केले व जंगलातील कक्ष क्र.११३८ मध्ये प्रेत ओढत नेले.कुटुंबातील व्यक्तींनी शेतावर गेले असता सदर महिलेच्या चपला आढळून आल्या.यानंतर कुटुंबियांनी गावात माहिती दिली.लगेच आवळगांव येथील वनविभागाच्या कर्मचारी यांनी शाेधमाेहिम सुरू केली असता घटनेच्या दिड तासानंतर सदर महिलेचे प्रेत कक्ष क्र.११३८ मध्ये आढळून आले.यानंतर घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच मेंडकी पाेलीस घटनास्थळी दाखल झाले असुन घटनेचा पंचनामा करीत प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.यावेळी दक्षिण वनवृत्ताचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर.डी.शेन्डे,वनक्षेत्रसहाय्यक ए.पी.करंडे,वनरक्षक लिलाधर सातपुते तसेच मेंडकी पाेलीस घटनास्थळी उपस्थित हाेते.