शहराच्या मध्यभागी असलेल्या सुपरिचित असलेल्या वीर सावरकर चौक जुनी लोखंडी पाण्याच्या टाकी जवळ असलेल्या कुंभारे दांपत्य यांच्या घरी आज दुपारच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मागील दार तोडून लाखो रुपयाचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला या चोरीमध्ये लाखो रुपये हे सोने व रोख रक्कम लंपास झाली
वरोरा येथील निवासी सुधीर वामनराव कुंभारे व त्यांची पत्नी हे दोघेही जिल्हा परिषद प्राथमिक शाळाबजिवती येथे कामावर असून दिनांक 28 मार्च 2000 22 रोजी सकाळी पाच वाजता जिवती येथे जाण्यास निघाले दुपारच्या सुमारास पती-पत्नी शाळेतून घरी आल्यावर घराचे समोरचे दार पूर्णपणे बंद होते तर मागील दार उघडे होते बेडरुमच्या दारातून कुलूप तोडून सदर चोर हे घुसून त्यांनी 20 ग्राम सोन्याची साखळी किंमत 70 हजार रुपये, दहा ग्रॅम सोन्याचा शिक्का किंमत 35 हजार रुपये ,दोन सोन्याचे पाच ग्रॅम ची गो गोप किंमत 35 हजार रुपये, पाच ग्राम कानातली रिंग किंमत वीस हजार रुपये, दोन ग्रॅम ची लहान मुलांची अंगठी किंमत पाच हजार रुपये, असे दोन लाख दहा हजार रुपयांची चोरी व रोख पंचेचाळीस हजार रुपये असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला या संदर्भाची तक्रार पोलीस स्टेशन वरोरा येथे करण्यात आली असून पोलिसांना अद्यापही चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही,
गावामध्ये दारूबंदी हटल्यानंतर चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे पोलीस प्रशासनाच्या सुस्त भूमिकेमुळेवरोरा शहरातील अवैध धंदे जोरात सुरू आहे, या सर्व प्रकारच्या घटनांवर, कोणत्या ही चोरीचा तपास लावण्यात पोलिस असमर्थ असल्याचे दिसून येत आहे, याआधीही चिकणी येथील रेल्वे ट्रॅक वर अज्ञात आरोपींद्वारा सिमेंटचे ट्रॅक पोल ठेवण्यात आले होते मात्र या संदर्भातही पोलिसांना अद्यापही यश आल्याचे दिसून येत नाही आहे एवढेच नव्हे तर वरोरा येथील गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या बँक ऑफ इंडिया येथील धाडसी चोरीचा तपासही अद्यापही पोलिसांना करता आला नाही, त्यामुळेच या घटनेचा तो तपासही पोलीस विभाग लावण्यात असमर्थ ठरतील का असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहे, गावातून जाणाऱ्या अवैध वाहतुकीवरही मात्र पोलिसांचा कोणताही अंकुश नसून थातूरमातुर कारवाई करून कमजोर लोकांनवर कारवाई पोलीस अधिकारी करून आपली प्रतिष्ठा प्राणाला लावण्यात पोलिस आपली शेखी मिरवत आहेत, मात्र एका विशिष्ट जनप्रतिनिधी च्या अधिपत्याखाली चालणाऱ्या सरकारवर मात्र पोलिसांचा कोणताही अंकुश नसल्याचेच दिसून येत नसल्याने पोलीस विभाग नतमस्तक तर नाही झाला नाही ना असे चित्र दिसून येत आहे, त्यामुळे नागरिक संभ्रमात असून पोलीस विभाग नेमकं करते तरी काय यावर संशय व्यक्त केला जात आहे.