कारंजा (लाड) : "पत्रकार" म्हणजे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ. शासन आणि समाजातील सर्वसामान्य नागरिकांना जोडणारा महत्वाचा दुवा. पत्रकार हा समाजाच्या डोळ्यातील अश्रू टिपून आपल्या लेखणीद्वारे त्याला वाचा फोडून, दुःखितांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देत असतो. आणि म्हणूनच समाजात पत्रकाराचे स्थान सर्वोच्च असते. त्यामुळे मोठ्यात मोठ्या सत्ताधिशालाही न्याय मागण्या करीता पत्रकाराकडेच धाव घ्यावी लागते.आणि म्हणूनच आम्ही लोककलावंतानी देखील, शासनाकडून आम्हाला न्याय मिळावा म्हणून अप्रत्यक्षपणे पत्रकाराकडेच धाव घेतली आहे. व वेळोवेळी जिल्ह्यातील सर्वच लहान मोठ्या दैनिक, साप्ताहिक, इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाच्या पत्रकारांनी लोककलावंताच्या बातम्या वेळोवेळी प्राधान्याने प्रसिद्ध करून अनमोल असे सहकार्य केले असून त्यांच्याच सहकार्यातून, जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगण वाशिम येथे होऊ घातलेले,बुधवार दि. 24 जानेवारी 2024 चे "लोककलावंताचे क्रांतिकारी आंदोलन" यशस्वी होणार असल्याचे विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त) संजय कडोळे यांनी सांगीतले आहे. आपल्या प्रसिद्धी पत्रकामधून पुढे त्यांनी सांगीतले की,गेल्या इ.सन. 2019 च्या सार्वत्रिक निवडणूकांपासून संपूर्ण महाराष्ट्रात शासनाकडून सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ते आणि लोककलावंतावर सातत्याने अन्यायच होतो आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून भारतिय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, कर्मविर दादासाहेब गायकवाड, साहित्य सम्राट लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, संत रविदास महाराज पुरस्कार, राष्ट्रपिता महात्मा गांधी पुरस्कार इत्यादीचे वितरण सोहळे प्रलंबीत ठेवण्यात आलेले आहेत.गेल्या पाच वर्षापासून शासनाने शासकिय निमशासकिय समित्यांचे कोठेही गठन केलेले नाही.त्यामुळे तळागाळातील सर्वसामान्य नागरिकांना लाभाच्या शासकिय योजनांपासून वंचित रहावे लागले.यामध्येही महत्वाचे म्हणजे ज्याप्रमाणे पत्रकार हा लोकशाहिचा चौथा आधारस्तंभ आहे.त्याचप्रमाणे "लोककलावंत हा शासनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करणारा जनजागृती करणारा एकमेव प्रचारक आहे." मात्र संपूर्ण हयातभर लोककलेकरीता जीवन समर्पित करणाऱ्या कलावंताची वृद्धापकाळी नियतीने उपेक्षाच होत आलेली आहे हेही तेवढेच सत्य आहे.मात्र यापुढे त्यांची उपेक्षा होऊ नये.त्यांना वृद्धापकाळी सन्मानाचे जीवन जगता यावे.हे विदर्भ लोककलावंत संघटनेचे व माझे स्वत:चेही निःस्वार्थ उद्दिष्ट आहे. त्याकरीताच लोककलावंताच्या सहकार्यातून मी गेल्या सात वर्षापासून हा लढा उभारला आहे. व या लढ्याकरीता मला तनमनधनाने केवळ आणि केवळ पत्रकारांचे सहाय्य मिळाले आहे. यातही उल्लेख करण्यासारखे म्हणजे मी कोणत्याही राजकिय हेतूने प्रसिद्धी मिळवीतच नाही. मी स्वतः दिव्यांग,बेघर,बेरोजगार व निर्धन व्यक्ती आहे.मला साधी नगर पालिकेची सुद्धा निवडणूक लढायची नाही.केवळ माझ्या सभोवतालच्या माझ्या सारख्या गोरगरीब कलावंताना वृद्धापकाळी सन्मानाचे जीवन जगता यावे याच नि:स्वार्थ हेतूने मी हा लढा उभारलेला असून, माझ्या लढ्यामध्ये संघटनेल यशस्वी करण्याकरीता पत्रकाराकडे मी आशेने पहात असून,आम्हा लोककलावंताना न्याय मिळवून देण्याकरिता पत्रकारांनी शासनाला जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. जिल्ह्यातील लोककलावंत आपल्या सहकार्या बद्दल आभारीच नव्हे तर आजन्म ऋणी राहतील. असे सुद्धा संजय कडोळे यांनी म्हटले आहे.