ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघ, ब्रम्हपुरीच्या वतीने दि.०६ जानेवारी रोजी अर्धसाप्ताहिक ब्रहपुरी समाचारच्या सभागृहात सकाळी १०.३० वाजता पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. याचे औचित्य साधुन पत्रकार दिन साजरा केला जातो. ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय रामटेके उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रा. श्याम करंबे, सचिव गोवर्धन दोनाडकर, सहसचिव महेश पिलारे, जेष्ठ पत्रकार दिलीप शिनखेडे, प्रा.विजय मुळे, नेताजी मेश्राम, जीवन बागडे, शिवराज मालवी, दिपक पत्रे, प्रशांत डांगे, प्रवीण मेश्राम, संतोष पिलारे, विनोद दोनाडकर, राहुल भोयर, रुपेश देशमुख आदी पत्रकार मंडळी यावेळी उपस्थित होते.खरी पत्रकारिता करतांना काय त्रास होतो, पत्रकारिता करतांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर याना मोठ्या प्रमाणात त्रास झाला होता. ब्रम्हपुरी येथील पत्रकार खेळीमेळीचे वातावरणात काम करीत आहेत. असे मत जेष्ठ पत्रकार प्रा. विजय मुळे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन व आभार महेश पिलारे यांनी केले.