कारंजा : कारंजा मूर्तिजापूर सिमेंट रस्त्याचे काम सुरू असताना आर.आर.एम.एस. इन्फ्रा.प्रायव्हेट लिमिटेड जयपूर या कंपनीने खानापूर शिवारातील सर्वे नंबर १२७ व १२८ मधील ई क्लास जमिनीवर सर्व शासकीय नियम पायदळी तुडवून अवैद्य उत्खनन केल्याची तक्रार संबंधित विभागाकडे किरण क्षार व अंकुश कडून यांनी केली आहे.त्यावर संबंधित विभागाने अहवाल सुद्धा दिली आहे.
उपरोक्त संदर्भीय विषयांचे अनुषंगाने आर.आर.एम.एस. इंफ्रा प्रा.लि.जयपूर या कंपनीने कारंजा खेर्डा चौपदरी रस्त्याचे काम सुरु असताना सिमांकन क्षेत्राच्या बाहेर मंजुरी पेक्षा जास्त (अवैध) ई क्लास जमीनीमधील उत्खनन केल्या बाबत, ई क्लास जमीनीमध्ये येणारे कृषी विभागाचे शेततळयामधील उत्खननाची परवानगी नसतानाही शेततळयामध्ये अवैध उत्खनन करुन मुरुम काढण्यात आला,मृद व जलसंधारण विभागाने आखून दिलेल्या जागेवर उत्खनन न करता दुस-या जागेवर उत्खनन करुन शासनाची दिशाभूल केल्या बाबत कृषी विभागा मार्फत खोदण्यात आलेल्या जुन्या शेततळयाच्या भिंती लगत असलेला शेततळयातील काढलेला मुरुम नेल्या बाबत तसेच रोजगार हमी योजनेच्या पत्रानुसार शेतळयाची परवानगी असताना तेथे शेततळयाच्या आकाराचे उत्खनन न करता खदानाचे स्वरुप देण्यात आले
बाबत संदर्भ क्र.१ नुसार तक्रार अर्ज या कार्यालयात प्राप्त झाला आहे. संदर्भ क्र. २ नुसार प्राप्त अहवालाचे अनुषंगाने मौजे खानापूर येथील ई क्लास १२७ व १२८ मध्ये कृषी विभागाचे १००X१०० मी.चे शेततळे आहे. सदर शेत तळ्याची खोली १/१/२ फुट (दीड फुट) केली आहे.ही खोलीकरण कंपनीने
केलेली आहे. मृद व जलसंधारण विभागामार्फत असून दिलेल्या जागेवर उत्खनन न करता दुस-या जागेवर उत्खनन केल्या बाबत मोक्यावर सदर विभागाने आखणी केलेली दिसत नाही. कृषी विभागाने शेततळे खोदकाम झालेल्या शेततळयाच्या बाजुला असलेला मुरुम उचल केलेला आढळला.शेत तळयाची परवानगी असताना शेततळयाच्या आकाराचे शेततळे आढळले नाही, त्यामधून उत्खनन करण्यात आले.गौण खनिज उत्खनन व वाहतूक सुर्यादय व सुर्यास्तापर्यंत करणे हया बाबत मंडळ अधिकारी व तलाठी यांनी कार्यवाही केली आहे. गट नं./स.नं.१२६ व १२८ मध्ये उत्खनन केलेले आढळले इतर उत्खनन केल्याचे आढळून आले नाही. मोकास्थळी सरपंच,मंडळ अधिकारी,तलाठी,अर्जदार व गावकरी मंडळी उपस्थीत होते,कृषी विभागाचे शेत तळेच्या बाजुचा मुरुम उचलुन त्या ठिकाणी इतर रॉ मटेरियल टाकलेले आढळून आल्याचे प्राप्त अहवालामध्ये नमुद केले आहे.
संदर्भ क्र.३ नुसार प्राप्त अहवालाचे अनुषंगाने दिनांक २०.०६,२०२४ रोजी तालुका कृषी अधिकारी,कारंजा रविंद्र जटाळे,कृषी सहाय्यक पी. बी.राऊत व तक्रारदार अंकुश कडू यांच्या समवेत तपासणी केली असता,सर्व्हे नं.१२७ व १२८ मध्ये अस्तीत्वात असलेल्या व आकारमानानुसार खोदकाम असलेल्या १००X१००X३ आकारमानाच्या शेततळयातील तळातील भाग अतिरिक्त खोदकाम केलेला आढळून आला व सदरच्या शेततळयाच्या पूर्वेकडील बांधाची काही प्रमाणात खोदाई करुन मुरुम काढलेला आढळून आले व त्याच भागाकडील बांधालगत अंदाजे ३००४५० मिटर आकाराचे खोदकमा केलेले आढळून आले.वरील दोन्ही बाजुच्या खोदकामामुळे अस्तीत्वात असलेल्या शेततळयाच्या भिंतीला धोका निर्माण झाला असून, पावसाळयात पाणी साठा जास्त झाल्यास शेततळे फुटून पाणी शेततळयाच्या आजु-बाजुला असलेल्या शेतामध्ये जावून जमीनीचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे प्राप्त अहवालामध्ये नमुद केले आहे.संदर्भ क्र.४ नुसार प्राप्त अहवालाचे अनुषंगाने उपविभागीय जलसंधारण अधिकारी,मृद व जलसंधारण उपविभाग, कारंजा यांनी दि. २८.०६.२०२४ रोजी स्थळ पाहणी केली असता, १) प्राथमिक शिफारस मधील अटी व शेर्ती प्रमाणे मौजे खानापूर ता.कारंजा येथील ई क्लास गट क्र. १२७ मध्ये कृषी विभागामार्फत पूर्ण करण्यात आलेल्या शेत तलावा पासून अंतर ठेवून काम करण्याचे आदेशीत असून सध्दा RRS Infra Pvt Ltd जयपूर यांच्या मार्फत सुरु असलेले उत्खनन करताना उपरोक्त शेत तलावा पासून कोणतेही अंतर न ठेवता अगदी भिंतीला लागून खोदकाम करण्यात आल्याचे दिसून आले,२) सदर शेत तलावाचे उत्खनन (१००X१००X३) मीटर या मापात करण्या बाबत परवानगी मिळाली असून क्षेत्रीय स्थळी हे उत्खनन ओबड-धोबड स्वरुपाचे आढळून आले (पावसाआधी स्थिती असल्यामुळे व तलावात १ बाजुला साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे लगेच माप घेणे शक्य झाले नाही,तसेच सदर काठावर चुनखडी व काळी माती आढळून आली) तरी Google Maps च्या सहाय्याने तलावाच्या बाहेरील बाजुचे अंतरे व क्षेत्रीय स्थळावरील अंदाजाप्रमाणे मोजमापे सोबत जोडलेल्या नकाशात दर्शविले आहे.३) प्राथमिक शिफारस मध्ये शेत तळ्याची आखून दिलेल्या काटछेदाच्या मर्यादेतच उत्खनन करता येईल याबाबत स्पष्ट नमुद करण्यात आले होते,पण परवानगी मध्ये नमुद कामाच्या मोजमापा प्रमाणे सदर खोदकाम झाले नसल्यामुळे परिमाणात होणारा बदल टाळता येणार नाही. तरी योग्य कार्यवाही करीता मोजमाप करणे आवश्यक असल्याचे नमुद केले आहे., ४) तसेच अटी व शर्तीप्रमाणे उत्खनन मधून निघणा-या माती/मुरुम/दगड चा वापर करुन तलावाच्या काठावर बांध तयार करण्यात यावे असे सूचित करण्यात आले आहे. (जेणेकरुन गायरान जमिनीवर चरणा-या गुरा-ढोरांचे बांधकामा पासून संरक्षण होईल) परंतु प्रत्यक्ष स्थळी अलीकडच्या काठाच्या बाजूला बांध करण्यात आल्याचे दिसून आले नाही. ५) कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या शेत तलावाच्या पूर्वेस लागून कंपनीने केलेल्या खोदकामात काळी माती टाकुण लेवल करण्यात आली असल्यामुळे तेथील खोलीचे माप घेणे शक्य होणे अवघड असल्याचे आढळले व तसेच खालील बाजूस काळया मातीचे ढीग असल्याचे सुध्दा दिसून आले. (कृषी तलावाचे खोदकामाची लांबी १०० मीटर असल्याचे सांगण्यात आले आहे,त्याच्या समान अंतराचे उपरोक्त खोदकाम झाले असावे व ते उतारात करण्यात आले असावे असे भू भागाच्या प्रथम पाहणीमध्ये आढळले.) ६) या तलावाच्या व्यतीरिक्त तक्रारीमध्ये नमुद Deep CCT लगतचे चारीचे (अंदाजीत लांबी ९० ते १०० मोटर) खोदकाम देखील तेथे आढळून आले,स्थळ चौकशी केली असता सदर खोदकाम स्थानिक शेतक-याने केल्याचे त्यांचे कार्यालयाचे उपविभागाच्या क्षेत्रीय कर्मचा-यांना सांगण्यात आले (परंतु काम नेमके कोणी केले याबाबत स्पष्ट खुलासा झालेला नाही) ७) तसेच कामाचे खोदकाम निर करण्यापूर्वी त्यांचे कार्यालयाचे क्षेत्रीय कर्मचा-यांकडून आखणी करुन दिल्या शिवाय काम सुरु करण्यात येवू नये असे अटी व शर्तीमध्ये नमुद केलेले होते,परंतु प्रत्यक्षात सदर खोदकामाची सुरुवात करण्याआधी ले आऊट घेण्याचे आलेले नाही व काम पुर्ण झाल्यावर करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने याबाबत माहिती या उपविभागाला मिळाली. या तलावाच्या काही अंतरावर दुस-या शेत तलावाचे सुध्दा उत्खनन सुरु आहे व उपरोक्त बाब या तलावाला सुध्दा लागू असून याबाबत पण पुर्ण कल्पना देण्यात आलेली नाही,परंतु सध्यस्थीत सदर उत्खनन प्रगतीपथावर असून खोदकाम अंदाजे योग्य मोजमाप व आकारात असल्याचे प्रथम दर्शनीय पाहणीत आढळून आले (मोजमाप घेण्यात आलेले नाही. ८) तसेच परवानगी पुर्व अहवाल सादर केल्यावेळी दाखविण्यात आलेल्या जागेवर सदर खोदकाम केलेले नाही व याचे स्पष्टीकरण विचारले असता, सदर खोदकामाबाबत ग्राम पंचायततर्फे ठराव दिले असल्याचे कंपनीचे उपस्थीत प्रतिनीधी यांच्याकडून सांगण्यात आले.(सदर ठरावाबाबत पुर्व कल्पना किंवा त्या ठरावाची प्रत या कार्यालयास उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही.९) सदर कामावर क्षेत्रीय कर्मचा- यांने देखरेख करणे व कामाच्या प्रगतीनुसार अहवाल सादर करण्या बाबतची सुचना परवानगी मधील अटी व शर्तीन्वये देण्यात आली होती, परंतु क्षेत्रीय कर्मचा-याला सदर परवानगी मिळाल्या बाबत व काम सुरु करण्या बाबत कंपनी मार्फत कळविण्यात आलेले नाही,त्यामुळे उपरोक्त खोदकाम त्यांचे कार्यालयाचे क्षेत्रीय कर्मचा-यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले नसल्याचे प्राप्त अहवालामध्ये नमुद केले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....