गुरुकुंज मोझरी येथील उपोषण स्थळी अनेक कार्यकर्त्यासह ॲड पाटणी पोहचले
कारंजा:- दिनांक 14जुन 2025 रोजी युवा नेते ॲड ज्ञायक पाटणी यांनी अनेक कार्यकर्त्यांसह बच्चू भाऊ कडु यांची उपोषण स्थळी भेट घेऊन आपले समर्थन दिले त्यांच्यासी चर्चा केली,संवाद साधला.
शेतकऱ्यांच्या कर्ज माफी सह विविध मागण्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री बच्चू भाऊ कडू यांनी गुरुकुंज मोझरी येथे अन्न त्याग आंदोलन सुरू केले होते. भाजप सत्तारूढ पक्षाने कर्ज माफीचे आश्वासन निवडणुकीत दिले होते. त्याचा विसर सरकाराला पडला. राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला. त्याचे शेतमालास पाहिजे तसा भाव न मिळाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला. असे असताना सुद्धा शेतकऱ्यास त्याच्या न्याय मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती सरकार संवेदनशील नसल्याचा शेतकऱ्यांना ,शेतकरी नेत्यांना आंदोलन करावी लागत आहे असा सूर जनतेत उमटला असुन बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनास शेतकऱ्यांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आणि या आंदोलनाच्या प्रतिक्रिया शेतकऱ्याकडून उमटायला सुरुवात झाली. यावेळी शेतकऱ्यांच्या व गोर गरिबांच्या प्रश्नाला नेहमीच प्राधान्यक्रम देणारे युवा नेते ॲड ज्ञायक पाटणी यांनी शेतकऱ्यांच्या महत्वाच्या कर्जमाफीच्या व अन्य विविध मागण्यासाठी उपोषण करीत असलेल्या बच्चूभाऊ कडु यांची भेट घेतली व त्यांना आपला पाठिंबा दिला.
ॲड मा.श्री. ज्ञायकजी पाटणी ,ठाकुरसिंग चव्हाण, श्रीधर पाटील कानकिरड ,तांडा सुधार अधक्ष प्रकाश राठोड, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योतीताई गणेशपुरे, ललितजी चांडक ,विजय अनंतकुमार पाटील, निळकंठ पाटील, अनिल नाईक उपसरपंच,मनोज कानकिरड, राजूभाऊ अवताडे, नितीन गाडगे,गजानन भाऊ राऊत, संकेत नाखले,श्री. श्याम राठोड, माजी सरपंच गणेश घोरसडे, सुरेश जाधव, श्रावण मेटकर ,गणेश खंडारे ,गौरव जाधव , विजय चव्हाण ,महेश राठोड़,श्रीकृष्ण मुंदे,मंगेश धाने, दिनेश वाडेकर, शुभम बोनके ,संतोष गुल्हाने, मनोज रसाळे शशी वेळुकर, अजय जाधव, धीरज वावगे आदीसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....