अकोला:-
देशभरातील बँक कर्मचाऱ्यांची संघटना ‘ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन’ AIBEAचा 80 वा स्थापना दिवस आज 20 एप्रिल 2025 रोजी देशभरात साजरा केला जात आहे.
1946 साली कोलकाता येथे AIBEA ची स्थापना झाली. ही संघटना देशातील बँक कर्मचाऱ्यांची सर्वात जुनी, मजबूत आणि लढाऊ संघटना आहे.
AIBEA ने गेल्या सात दशकांमध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्षशील लढे दिले आहेत. वेतन करार, सेवा अटी, कामाचे तास, निवृत्ती वेतन, सामाजिक सुरक्षा योजना यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर संघटनेने निर्णायक भूमिका बजावली आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या जीवनात स्थैर्य आणि सुरक्षितता निर्माण करण्याचे श्रेय मोठ्या प्रमाणात AIBEA ला जाते. AIBEA च्या कार्याचा व्याप केवळ कर्मचारी हक्कांपुरता मर्यादित नाही. बँकिंग क्षेत्राच्या सुधारणांसाठी आणि सामाजिक उत्तरदायित्वासाठी संघटनेने सदैव पुढाकार घेतला आहे. खासगी बँकिंगविरोधात, बँकांच्या राष्ट्रीयीकरणासाठी, सर्वसामान्य जनतेला बँकिंग सेवा पुरवण्यासाठी आणि आर्थिक समावेशनासाठी AIBEA ने सरकारपातळीवरही भरीव भूमिका निभावली आहे.
या स्थापना दिनानिमित्त देशभरातील सर्व बँकेतील कॉम्रेडस विविध उपक्रमांचे ठिक ठिकाणी आयोजन करत आहे. बैठका, चर्चासत्रे, सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिरे, आर्थिक जनजागृती मोहीमा यांद्वारे AIBEA आपल्या सामाजिक बांधिलकीची जाणीव सातत्याने ठेवत आहे.
याच निमित्ताने अकोल्यातील विविध बँकेतील AIBEA चे सदस्य ऑल बँक को-ऑर्डिनेशन कमिटी AIBEAअकोला तर्फे सुद्धा आनंद आश्रम, गुडधी, अकोला येथे खऱ्या गरजवंताना जीवनावश्यक वस्तू राशन देऊन AIBEA चा 80 वा स्थापना दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉइज असोसिएशन चे पदाधिकारी कॉम. प्रवीण महाजन यांनी AIBEA ही संघटना "एकता हीच ताकद" या तत्वावर विश्वास ठेवून पुढे वाटचाल करत आहे. या दिवशी आपण सर्वांनी संघटनेच्या गौरवशाली परंपरेचा अभिमान बाळगावा आणि पुढील काळातही संघटनेच्या ध्येयधोरणांना बळकटी देण्यासाठी कटिबद्ध राहावे असे आवाहन केले.
बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन चे पदाधिकारी कॉम. उमेश शेळके यांनी आपण आपल्या त्यागमूर्ती नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नमन करतो ज्यांनी संघटनेच्या पाठीशी राहून आपले आयुष्य अर्पण केले, त्या सर्वांना आदरपूर्वक वंदन करत स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया एम्प्लॉइज युनियन चे पदाधिकारी कॉम. हर्षल बोर्डे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पुढील वाटचाल कठीण आहे म्हणून संघर्ष अजूनही बाकी आहे. एकता हीच आपली ओळख आहे. AIBEA हे केवळ नाव नसून एक चळवळ, एक आंदोलन व प्रेरणा आहे. संघटने सोबत एकजूट रहावे असे आवाहन केलं.
या वेळी युनियन बँकेचे कॉम. केवल ठाकूर, इंडियन बँकेचे कॉम. सचिन पाटील, पंजाब नेशनल बँकेचे कॉम. मयूर अग्रवाल व कॉम. सुमित ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला विविध बँकेतील पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने कॉम.अविनाश आखरे, कॉम.संतोष गायकवाड, कॉम.देवलाल शिरसाट, कॉम.शुभम लांडे, कॉम.कौडण्य, कॉम.बोंदडे, कॉम. शुभांगी मानकर, कॉम.शिल्पा ढोले, कॉम.प्रांजली निबंधे, कॉम.पूनम अग्रवाल, मंगेश कुलकर्णी, संतोष राणे, कुंदन, संतोष, सुनील निकम, सौरव, प्रवीण पाग्रूत , राहुल गोगटे ई सह विविध बँकेतील पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....