अकोला:- कोविड पासून शेअर मार्केटकडे वळण्याचा लोकांचा कल अधिक वाढत चाललेला आहे. कोविड पर्यंत दहा कोटी डिमॅट अकाउंट होते आपल्या भारतामध्ये परंतु कोविड नंतर ही संख्या झपाट्याने वाढत गेली आणि बघता बघता आपण वीस कोटीपर्यंत पोचलो आहे.
कोविड सुरू असताना घरी बसल्या बसल्या काय करायचे तेव्हा सर्व बंद होते परंतु शेअर मार्केट सुरू होते, त्यामुळे लोकांना हे आवडू लागले.
प्रत्येकांला आपण कमवीत असलेल्या पैशांव्यतिरिक्त अजून पैसे कसे कमवता येतील यासाठी वेगवेगळे माध्यम लोक शोधत असतात आणि अशातच शेअर मार्केट हा त्यांना उत्तम पर्याय वाटतो.
त्यांना असे वाटते की न शिकता देखील यातून आपण पैसे कमवू शकतो जसे की लॉटरी लागली वरली मटका जुगार याप्रमाणे. अंदाजे घ्यायची आणि अंदाजे विकायच, परंतु कुठल्याही क्षेत्रात जोपर्यंत आपण ज्ञान मिळत नाही तोपर्यंत त्यातील खाचे खोचे समजत नसतात हे लोकांना लक्षातच येत नाही.
एखाद्या वेळेस पैसे मिळू शकतात परंतु सारखे सारखे नाही.
लोकांना दीर्घकालीन गुंतवणुकीत पैसा बनू शकतो यावर विश्वास नाही परंतु फ्युचर आणि ऑप्शन या सेगमेंटच्या माध्यमातून त्यांना झटपट श्रीमंत व्हायचे असते आणि त्यात विना अनुभव आणि विना ज्ञानाचे ट्रेडिंग करून लोक पैसे घालवता.
शेअर मार्केट मध्ये अल्पावधीत पैसे कमवण्याच्या यशस्वी लोकांची यादी पाहिली तर फक्त 9% लोक अल्पावधीत केलेल्या गुंतवणुकीतून यशस्वी झालेले आहे आणि 91% लोक यातून प्रायशस्वी झाले आहे.
नुकताच सेबीने सादर केलेला अहवाल त्यात त्यांनी सांगितले आहे की यंदा लोकांनी फ्युचर आणि ऑप्शनच्या माध्यमातून 1,05,000 करोड रुपये घालवले आहेत. हा आकडा मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढला आहे, मागच्या वर्षी 70 लाख करोड एवढा आकडा होता.
फ्युचर आणि ऑप्शन सेगमेंट मुळे माणूस सरासरी दोन लाख रुपये वर्षाला घालवतो आणि मागच्या वर्षी पर्यंत 55 लाख लोक या फ्युचर आणि ऑप्शन मुळे मार्केट मधून कायमचे बाहेर पडले.
मग निराश झालेले लोक मार्केट तर करायचा आहे मग काही पर्याय मिळतो का याचे शोधात असतात.
अशातच आपण जेव्हा डिमॅट अकाउंट काढतो तेव्हा आपला डेटा लीक होतो आणि मग आपल्याला विविध लोकांचे कॉल येतात, आम्ही तुम्हाला काही टिप्स देऊ रोजचे तुम्हाला आमचे कॉल येतील त्यातून तुम्ही पैसे कमवू शकता त्यासाठी तुम्हाला महिन्याला आम्हाला एवढे चार्जेस द्यावे लागतील. लोक त्याला मान्यता देतात आणि तिथे देखील त्यांचा भ्रमनिराशच होतो कारण हे लोक एकाच वेळेस दोन वेगवेगळ्या सूचना देतात एकच कॉल पण काही लोकांना खरेदी करा असे सांगतात तर काही लोकांनाही विका असे सांगतात, मग यात काही न नफा तर काही नुकसान होते, पुढच्या वेळेस ज्यांना खरेदी करा सांगितलं असतं त्यांना विकायला सांगतात आणि ज्यांना विकायला सांगितले त्यांना खरेदी करायला सांगतात.
परंतु ओव्हरऑल जर बघितले तर त्यात लोकांचा प्रॉफिट होतच नाही. मग लोक हा देखील मार्ग सोडतात. परंतु यांना वेगवेगळी लोक भेटतच राहतात आणि कमाईचे साधन त्यांचे सुरूच राहते.
आणखीन दुसरा प्रकार म्हणजे आम्ही तुमचे डिमॅट अकाउंट हॅण्डल करतो त्यासाठी आम्हाला महिन्याला एवढे पैसे द्या, असे देखील कधीच करू नका आपले अकाउंट देखील दुसऱ्यांना हँडल करायला देऊ नका किंवा आपले पैसे देखील दुसऱ्याला देऊ नका दुप्पट करून देतो म्हणून.
असे लोक फक्त लोकांची दिशाभूल करतात आणि स्वतःचा स्वार्थ साधतात मात्र लोक यात फसतच जातात आणि हल्ली हे प्रकार खूप वाढत चाललेले आहेत.
चांगल्या इन्स्टिट्यूट ला जॉईन करा, आधी क्लास करा मार्केटमध्ये डिसिप्लिन रहा, मार्केटची सर्व नियम फॉलो करा, तुम्हाला या अशा लोकांमुळे मार्केट बद्दल गैरसमज झाला आहे शेअर मार्केट हा जुगार आहे ही नाण्याची एकच बाजू तुम्ही पाहिली परंतु जर आपण दीर्घकालीन गुंतवणूक केली तर याच्यासारखे पैसे दुसरीकडे कुठेच बनत नाही.
त्यामुळे नेहमी दीर्घकालीन गुंतवणुकी वरती भर द्या.
जर आपण इंत्राडे करत आहात तर खालील नियम लक्षात ठेवा.
दिलेल्या लेवलवरच खरेदी करा.
खरेदी केल्यावर लगेचच स्टॉप लॉस लावा.
जास्त लालच करू नका.
घेतलेल्या पोझिशनमध्ये एव्हरेज कधीच करू नका.
आजची पोझिशन उद्यासाठी फॉरवर्ड करू नका.
कोणाकडूनही टिप्स घेऊ नका.
जेव्हा आपण आपली डिमॅट अकाउंट सकाळी ओपन करतो तेव्हा सेबी आपल्याला सावध करत असते की दहा पैकी नऊ लोक फ्युचर आणि ऑप्शनच्या सेगमेंट मुळे नुकसान करून घेतात. परंतु लोक हे सूचना न बघता कधी ट्रेडिंग करून मी पैसे कमवेल असे त्यावेळी झालेले असतात.
नेहमी हे वरील नियम जर लक्षात ठेवले तर आपण मार्केटमध्ये दीर्घकाळापर्यंत टिकून राहो. शेवटी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा.
"नो लर्निंग नो अर्निंग"
"लर्निंग देन यू विल गेट अर्निंग".
"मोर लर्निंग मोर अर्निंग".
अभय जागीरदार
9850041650
चार्ट देखो स्टॉक मार्केट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट निगडी पुणे
आपल्या प्रतिक्रिया द्या....