सर्वधर्म मित्र मंडळ संस्था कारंजा लाड संस्थेच्या माध्यमातून व RISE PECO World Sunnit 2025 तसेच Anemia Free India Forum आणि सहाय्यक ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विध्यामाने वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यातील काजळेश्वर येथे दिनांक २८/०१/२०२५ रोजी ग्रामपंचायत सभागृहात अनेमिया मुक्त गाव कार्यशाळ संपन्न झाली.
सदर कार्यशाळे करिता काजळेश्वरचे युवा सरपंच श्री नितीन उपाध्ये हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तसेच काजळेश्वरचे आरोग्यवर्धीनीचे डॉ.प्रशांत वाघमारे सर, उपसरपंच मा. तौसिमोद्दिन मुल्लाजी, मा.विनोद उपाध्ये, प्राथमिक आरोग्य केंद्र पोहा अशा गट प्रवर्तक सौ. विजया बासोडे, ए जि सोनोने आरोग्य सहाय्यक पोहा, रामेश्वर बंड, सचिनभाऊ सिद्गुरू आणि सर्वधर्म मित्र मंडळ संस्थेचे अकोला जिल्हा प्रभारी समन्वयक समाधान इंगळे व राजू कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
सदर कार्यशाळेला पोहा आयुष्यमान भारत आरोग्य केंद्रातील ९ गावातील अशा सेविका व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कारंजा लाड अंतर्गत तालुक्यातील सर्वात जास्त अनेमिक असलेल्या गावाची यादी सदर कार्यालयाने दिल्यानंतर तालुक्यातील काजळेश्वरचे हे गाव अनेमिक म्हणून कार्यालयाने सुचविले त्यानुसार सर्वधर्म मित्र मंडळ संस्थेचे अध्यक्ष श्याम सवाई व काजळेश्वरचे आदर्श सरपंच श्री नितीन पाटील उपाध्ये याचे सोबत झालेल्या चर्चेत आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नांदे सर यांच्या मार्गदर्शनात प्रायोगिक तत्वावर काजळेश्वर हे गाव निवडण्यात आले व डॉ. प्रशांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यशाळा पार पडली.
अनेमिया मुक्त गाव कार्यशाळेत सहाय्यक ट्रस्ट आणि Anemia Free India Forum चे मार्गदर्शन धोरणाचा अवलंब करून PPT द्वारे व विविध उदाहरणाद्वारे सदर संकल्पना प्रत्यक्ष्यात कशी उतरवतो शकतो याचे मार्गदर्शन सहाय्यक ट्रस्ट चे प्रवीण प्रशिक्षक तथा सर्वधर्म मित्र मंडळ संस्थेचे वाशीम जिल्हा समन्वयक राजू कांबळे यांनी केले. सदर कार्यशाळेत सरपंच श्री नितीन उपाध्ये, आरोग्यवर्धीनीचे डॉ.प्रशांत वाघमारे सर तसेच सोनोने सर आरोग्य सहाय्यक पोहा यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व विशेष म्हणजे प्रशिक्षण सामोरोपीय कार्यक्रमादरम्यान पोहा येथील अशा सेविका योगिताताई जाधव यांनी आपले प्रशिक्षणा बद्दलचे मनोगत व्यक्त केले.
RISE PECO World Sunnit च्या मानसी गमरे व सर्वधर्म मित्र मंडळ च्या सचिव सौ प्रणालीताई सवाई यांचे सहकार्य लाभले. वाशीम जिल्ह्यात अनेमिया मुक्त गाव संकल्पना सर्वधर्म मित्र मंडळ च्या माध्यामातून राबविण्याचे ठरविण्यात आले आहे.