अकोला : मुर्तिजापूर येथून जवळच असलेल्या मुरंबा येथील माजी पोलिस पाटील तथा महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त राजेंद्र समाधान भटकर यांची शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कारासाठी 2019-20 साठी निवड झाली आहे. राजेंद्र भटकर हे गेल्या 28 वर्षापासुन समाज कार्य करतात शासनाचे कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता ते अहोरात्र शाळा, महाविद्यालयामध्ये जाऊन ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात कोरोना महामारीच्या काळातही त्यांचे समाजजागृतीचे कार्य सुरु होते. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या या कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
त्यांचा सपत्नीक सत्कार मुंबई येथील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मींग आर्टस,( NCPA) जमशेद भाभा नाटयगृह, एनसीपीए मार्ग, नरीमन पॉइंट, मुंबई येथे मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा तथा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार संघटनेचे वाशिम जिल्हाध्यक्ष संजय कडोळे (ज्येष्ठ पत्रकार ) यांचेकडून अभिनंदन करण्यात येत आहे.